श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास केंद्र वडगाव मावळ यांच्या वतीने श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त अखंड जप नाम यज्ञ सप्ताह दिनांक 20 डिसेंबर ते दिनांक 27 डिसेंबर या कालावधीत संपन्न होत आहे. या सप्ताहात सामूहिकपणे श्री गुरूचरित्र वाचन पारायण होत असते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वडगाव शहरातील स्वामी भक्तांच्या उपस्थितीत दररोज सामूहिक गुरुचरित्र वाचन, सकाळी भूपाळी आरती, नैवेद्य आरती, औदुंबर प्रदक्षिणा, स्वामी चरित्र पाठ, नित्य स्वाहाकार, गणेश याग, श्री दत्त (स्वामी) याग, रुद्र याग, चंडी याग अशा विधिवत सेवा पार पडत आहेत. या सप्ताह काळात वेदतुल्य परम प्रासादिक श्रीमद् गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण आणि यज्ञाद्वारे विविध देवदेवतांची अतिउच्च सेवा सप्ताह काळात होत असून सर्व सेवेकरी भाविक दिवस-रात्र अखंड नामस्मरण करून उपासना करत आहेत. ( reading of gurucharitra granth on occasion of shri dutt jayanti festival in vadgaon maval )
अधिक वाचा –
– ‘वडगाव बाजारपेठेतील मुख्य रस्ता आहे तोच कायम ठेवा’, बाजारपेठेतील घरमालकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
– पवना शिक्षण संकुलामध्ये यु.पी.एल. कंपनीच्या 50 लाख निधीतून बांधण्यात आलेल्या अद्ययावत स्वच्छतागृहाचे लोकार्पण
– ‘देहूतील सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत झाल्या पाहिजेत’, प्रशासनाने कारवाई न केल्यास मनसेकडून ‘खळ्ळ-खट्याक’चा इशारा