पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत विविध पदांची भरती चालू आहे. या नोकर भरतीमध्ये स्थानिकांसाठी राखीव कोठा ठेवण्याची मागणी युवा सेनेचे पुणे, मावळ लोकसभा अध्यक्ष विश्वजित बारणे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली. याबाबत आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यात बारणे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत विविध पदांची भरती चालू आहे. त्यामधील अनेक पदांची भरती प्रक्रियेतील परिक्षा झाल्या आहेत. या भरती मध्ये स्थानिक युवावर्गासाठी कोणत्याही प्रकारच्या राखीव जागा नसल्याने भरती मध्ये आपल्या व इतर जिल्ह्यातील युवा वर्गांनी फॉर्म भरले आहेत. महापालिका हद्दीतील युवकांना संधी मिळण्यासाठी पिंपरी-चिंचवडसाठी काही जागा राखीव जागा ठेवण्यात याव्यात.
शिष्टमंडळात युवासेना शहर संघटक राजेंद्र तारस, युवासेना उपशहर प्रमुख माऊली जगताप, युवासेना पिंपरी विधानसभा अध्यक्ष निलेश हाके, युवासेना चिंचवड विधानसभा अध्यक्ष मंदार येळवंडे, पिंपरी विधानसभा संघटक निखिल येवले, युवतीसेना चिंचवड विधानसभा समन्वयक रितु कांबळे, युवासेना चिंचवड विधानसभा समन्वयक अभिजीत पाटील, युवासेना चिंचवड विधानसभा संघटक अविनाश अडसुळ, युवासेना चिंचवड विधानसभा समन्वयक शुभम चौधरी, युवासेना पिंपरी उपविधानसभा संघटक निजाम शेख, युवासेना पिंपरी उपविधानसभा संघटक आशीष बाबर, विक्रम झेंड, महेश गेजगे, प्रमोद चव्हाण, अनिकेत भोसले, ओमकार पुजारी, उत्कर्ष गुंडे आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– कौतुकास्पद.! आजिवली येथील ज्ञानेश्वर विद्या निकेतनचा दहावीचा निकाल 96 टक्के; शुभम राऊत 89 टक्के गुणांसह प्रथम
– वडेश्वर गावात मोफत आरोग्य शिबिर; धन्वंतरी मेडिकल, डॉ. बडे हॉस्पिटल आणि ग्रामपंचायत यांचा संयुक्त उपक्रम