ऐसा सांडूनी सोहळा। मी का राहेन निराळा॥
श्रीराम जन्मभूमी अयोध्या इथे 500 वर्षानंतर प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि श्री राम मंदिर लोकार्पण सोहळा होत आहे. त्यानिमित्ताने सर्व देशभर अनेक उपक्रम, कार्यक्रम सुरू आहेत. वडगाव शहरातही श्री पोटोबा महाराज देवस्थान, सर्व गणेशोत्सव मंडळ आणि वडगाव मधील सर्व सार्वजनिक संस्था मिळून ग्रामस्थांचे सहकार्याने सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी विशेष नियोजन करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सोमवारी (दि. 22) पहाटे 6 वाजता अभिषेक, सकाळी 11 वाजता अयोध्या येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण, प्रसाद वाटप, सायंकाळी 4 वाजता पंचमुखी मारुती मंदिर येथून भव्य मिरवणूक सोहळा आदी धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच अयोध्या इथे गेलेल्या कारसेवकांचा सत्कार, तदनंतर भव्य दीप उत्सव सोहळा आणि 7 वाजता श्री पोटोबा महाराज मंदिर येथे महाआरती आणि नंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. ( Religious Programs Planned In Vadgaon Maval On January 22 Occasion Of Ram Mandir Dedication Ceremony )
सर्व वडगांवकर भाविक बंधू-भगिनींनी ‘याची देही याची डोळा’ हा सुख सोहळा अनुभवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी आपल्या घरासमोर पणती-दिवे लावावेत, घरासमोर रांगोळी काढावी, घरावर भगवा ध्वज उभारावा, आकाश कंदील लावावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. प्रभू श्रीराम यांचे हृदयपूर्वक स्वागत करून घरोघरी गोड नैवैद्य तयार करून दिवाळी साजरी करावी, असेही आवाहन श्री पोटोबा महाराज देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– बापूसाहेब भेगडेंवर अजित दादांकडून नवी जबाबदारी, थेट राज्य पातळीवर काम करण्याची दिली संधी! । NCP Bapu Bhegade
– लोणावळ्यात शनिवारी होणार ‘इंद्रायणी नदी आणि महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता’, IPS सत्यसाई कार्तिक यांचे नागरिकांना आवाहन । Lonavala News
– ब्रेकिंग! मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 6 तास महामार्ग राहणार बंद, लगेच वाचा