व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 1, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तब्बल 20 वर्षांनी पुन्हा भरली शाळा ; न्यु इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांकडून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा । Vadgaon Maval

आपण ज्या शाळेत शिकलो, खेळलो, मोठं झालो, ते माजी विद्यार्थी तब्बल 20 वर्षानंतर पुन्हा एकत्र आल्याने अनेकांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 5, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Relive school life memories from former students of New English School Vadgaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आपण ज्या शाळेत शिकलो, खेळलो, मोठं झालो, ते माजी विद्यार्थी तब्बल 20 वर्षानंतर पुन्हा एकत्र आल्याने अनेकांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले होते. वडगाव मावळ येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या 2006-2007 दहावीच्या बॅचच्या आठवणी पुन्हा जागविण्यासाठी राज्यभर विखुरलेल्या विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी मेळाव्यास आवर्जून हजेरी लावली होती. ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेत पुन्हा एकत्र येवून त्याच वर्गात बसून विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणीनं उजाळा दिला.

त्यांतर सर्व विद्यार्थी व शिक्षक वडगाव येथील राजमुद्रा बँक्वेट हॉलवरती एकत्र जमले त्यानंतर विद्यार्थीनींनी शिक्षकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भाऊसाहेब ढोरे, राजेंद्र सातकर, सुहास इंदलकर, मोनाली भेगडे, योगिता अहिरेकर, अतिश ढोरे आपले मनोगत व्यक्त केले. तसेच या स्नेहमेळाव्यला कुलूमकर सर, अहिरेकर सर, शेख सर, बसागरे सर, उबाळे सर, नेवसे सर, वंजारी सर, धुमाळ मॅडम, राउत मॅडम, गजरे मॅडम, कदम मॅडम, आडमुठे सर, वाघवले मॅडम, अनिल कोद्रे सर, जालिंदर ढोरे, परिठे सर, वनराज ढोरे आदींनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी कुलूमकर सर, धुमाळ मॅडम गजरे मॅडम, उबाळे सर आदींनी इतक्या वर्षांनी एकमेकांविषयी दाखवलेल्या आपुलकीचे कौतुक केले. माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या आठवणी सांगत शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. वय, पद, प्रतिष्ठा व व्यस्त दिनक्रम हे सर्व बाजूला ठेवून मैत्रीची भावना जोपासत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उत्साहात एकत्र जमले होते. तब्बल २० वर्षांनी भेटत असल्याने एकमेकांची ओळख लागते का नाही, ही भावना त्यांच्या मनामध्ये होती.

  • परंतु, एकत्र आले, भेट झाली अन् सर्वांनी जल्लोष केला. यावेळी सर्वच माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवर्णीना उजाळा दिला. एकत्रित केलेला अभ्यास, शिक्षकांचा वचक, खेळांच्या स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, नवनवीन उपक्रम अशा अनेक गप्पांच्या ओघात विद्यार्थी अक्षरशः आपले वयही विसरून गेले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी एकत्र बसून स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. तसेच एकमेकांना पुढील वाटचालीसाठी निरोगी व आनंददायी जीवनासाठी शुभेच्छा देत निरोप घेतला

कार्यक्रमाचे नियोजन श्रीधर मराठे भाऊ ढोरे,सतिश गाडे,सुहास इंदलकर,अतिश ढोरे,मोनाली वायकर,योगिता अहिरेकर, दिपाली भोंडवे,श्रीकांत महामुनी, रोहित भोर ,सतिश ढोरे, योगेश डुकरे रोहन डुकरे राजेंद्र सातकर, विनय लंवगारे प्रिया लचके, नितीन साळुंके, गौरव लोहर,सुवर्णा ओव्हाळ, रूपाली म्हळासकर,मैना ढमाले गीतांजली धोत्रे, रोहिणी निकम, निलिमा पिंपळे शुभांगी चव्हाण, सुषमा ठोंबरे,काजल सातकर, प्रतिका ढोरे, स्वप्निल आवटे आकाश टोपे आकाश चिवटे उमेश घारे, इमान शेख,तृप्ती भेगडे, रूपाली ढोरे, प्रिया लोखंडे, तृप्ती चव्हाण,यांनी केले तर सूत्रसंचालन मोनाली वायकर जगताप व सुहास इंदलकर यांनी केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आम्हाला पैसे नको ! लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणीची धास्ती, योजनेचा लाभ नको म्हणत ‘इतक्या’ बहिणींची माघार । Ladki Bahin Yojana
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्याकडून कारवायांचा धडाका ! अंमली पदार्थ, गांजा विक्री व बेकायदा जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल
– बोरघाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाला ‘वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर’ यांचे नाव देण्याची मागणी । Mumbai Pune Missing Link


Previous Post

मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणार्‍या पिकअप चालकाला अटक । Dehu Road News

Next Post

लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढविणारी बातमी : चारचाकी असणाऱ्यांची घरोघरी जाऊन होणार तपासणी । Ladki Bahin Yojana

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Mazi Ladki Bahin Yojana Women will not get benefit of scheme if they own four-wheeler

लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढविणारी बातमी : चारचाकी असणाऱ्यांची घरोघरी जाऊन होणार तपासणी । Ladki Bahin Yojana

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Last rites of former Maval MLA Krishnarao Bhegde

माजी आमदार कृष्णराव भेगडे पंचतत्वात विलीन ! जनसामान्यांच्या असामान्य नेतृत्वास साश्रूनयनांनी अखेरचा निरोप

July 1, 2025
DCM Ajit Pawar pays emotional tribute to former Maval MLA Krishnarao Bhegde

मावळ, पुण्याच्या विकासासाठी समर्पित नेतृत्वं हरपलं ! अजित पवारांकडून कृष्णराव भेगडे यांना श्रद्धांजली अर्पण

July 1, 2025
Never-seen photos of Krishnarao Bhegde See only on Dainik Maval Krishnarao Bhegde Passes Away

“कृष्ण मेघांची छाया हरपली…” स्व. कृष्णराव भेगडे यांचे कधीही न पाहिलेले फोटो – पाहा फक्त दै. मावळवर । Krishnarao Bhegde Passes Away

July 1, 2025
Maval Vidhan Sabha Former MLA Krishnarao Bhegde Passes Away Talegaon Dabhade

मावळचा आधारवड हरपला ! मावळभूषण, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन । Former MLA Krishnarao Bhegde Passes Away

June 30, 2025
Shri Sant Tukaram Cooperative Sugar Factory

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे ऊस लागवडीबाबत धोरण जाहीर – वाचा सविस्तर

June 30, 2025
Pavana-Dam-Maval

पवना धरणात 58 टक्के पाणीसाठा ! गतवर्षीपेक्षा 40 टक्क्यांहून अधिक जलसाठा । Pawana Dam Updates

June 30, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.