बुधवार (14 डिसेंबर) रोजी मावळ तालुक्यातील गोडुंब्रे इथे गावातील धनगर लोक डोंगर भागात शेळी चारत असताना एका शेतात रानमांजरीची 2 पिल्ले आढळून आली. या नागरिकांनी याबाबतची माहिती त्वरित वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य विनय सावंत यांना दिली. ( Rescue of Wild Cat Cubs At Godumbre In Maval taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यानंतर वनविभाग आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य विनय सावंत, निनाद काकडे, जिगर सोलंकी, रोहित पवार यांनी वेळ न दवडता रानमांजरीच्या पिल्लांना रेस्क्यू केले. त्यानंतर तळेगांव येथील डॉ. धडके यांच्याकडे प्राथमिक उपचार करून पिल्ले एकदम व्यवस्थित आहे, याची माहिती वडगाव वनपरीक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांना दिली. तसेच, त्यांच्या निरक्षणाखाली पिल्लांना आई सोबत रियुनियन करण्यासाठी ठेवली. त्यावेळी मध्यरात्री पिल्लांची आई पिल्लांना घेऊन गेली.
वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे, अध्यक्ष अनिल आंद्रे गणेश निसाळ यांनी लोकांना आव्हान केले आहे की, कोणताही वन्य प्राणी आढळून आल्यास त्यापासून लांब रहावे आणि वनविभागाला संपर्क करावा. तसेच, टोल फ्री क्रमांक 1926 वर संपर्क करावा. कुणीही वन्य प्राणी पाळू नये किंवा मारू नये.
अधिक वाचा –
– पालकांनो, मुलं सांगतात ती कारणे खरी की खोटी हे एकदा तपासून पाहा; अन्यथा ‘असा’ शोक करण्याची वेळ तुमच्यावरही येऊ शकते
– पुणे जिल्हा परिषदेमार्फत आयोजित एकदिवसीय तांदूळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद, दिवसभरात लाखोंची उलाढाल