व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सेवानिवृत्त ‘ईपीएस’ कर्मचारी पेन्शनधारकांना लवकरच मिळणार दिलासा ; रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांचे आश्नासन

देशातील औद्योगिक, सार्वजनिक, सहकारी, खासगी क्षेत्रातील 67 लाख सेवानिवृत्त ‘ईपीएस’ कर्मचारी पेन्शनधारक आहेत. त्यांना अंत्यत तुटपुंजे केवळ एक हजार रुपये पेन्शन मिळते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 6, 2025
in पुणे, ग्रामीण, देश-विदेश, शहर
Retired EPS employees pensioners will get relief soon Minister Mansukh Mandaviya statement

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : देशातील औद्योगिक, सार्वजनिक, सहकारी, खासगी क्षेत्रातील 67 लाख सेवानिवृत्त ‘ईपीएस’ कर्मचारी पेन्शनधारक आहेत. त्यांना अंत्यत तुटपुंजे केवळ एक हजार रुपये पेन्शन मिळते. मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीही अपुरे आहे. त्यामुळे सर्व ‘ईपीएस’ 95 निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत वैद्यकीय सुविधांची तरतूद तसेच या योजनेत समाविष्ट नसलेल्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांसह त्यांना नऊ हजार रुपये पेन्शन देण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे केली. त्यावर यावर सरकार सकारात्मक असून लवकरच पेन्शनधारकांना दिलासा मिळेल, अशी ग्वाही मांडविया यांनी दिल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

‘ईपीएस’ 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने पेंशनच्या मागणीसाठी जंतरमंतर दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे. खासदार बारणे यांनी या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला. या मागण्यांचा पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. देशभरातून आलेले पेंशनधारक कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी संघटनेचे अध्यक्ष अशोक राऊत, सहकारी तसेच पिंपरी-चिंचवड शहरातून आलेले अनेक पेंशनधारक कर्मचारी आंदोलनात सक्रिय सहभागी झाले. सर्वसामान्य निवृत्त कर्मचाऱ्यांचे हक्क सुरक्षित राहावेत यासाठी ही लढाई अत्यंत महत्त्वाची असल्याची खासदार बारणे यांनी सांगितले. त्यानंतर खासदार बारणे यांनी मंगळवारी रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेतली.

खासदार बारणे म्हणाले की, ‘ईपीएस’धारकांच्या पेन्शनमध्ये वाढ व्हावी यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. सभागृहात शून्य तासांतर्गत अनेकदा हा मुद्दा उपस्थित केला आहे. परंतु आजपर्यंत या समस्येचे निराकरण झाले नाही. 16 नोव्हेंबर 1995 पासून लागू करण्यात आलेल्या ‘ईपीएस’ 95 योजनेने कर्मचारी कुटुंब निवृत्ती वेतन योजना 1971 ची मालमत्ता आणि दायित्वे आत्मसात केली. ज्यामुळे मोठ्या संख्येने कर्मचार्‍यांवर परिणाम झाला. सेवाकाळात ज्यांनी भरीव योगदान दिले होते. त्याला आता दरमहा 1170 रुपये नाममात्र पेन्शन मिळत आहे. हे मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीही अपुरे आहे. 2014 मध्ये किमान पेन्शन 1,000 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर नियमातील बदल आणि एकतर्फी निर्णयांमुळे अपेक्षित वाढ देण्याऐवजी पेन्शनमध्ये आणखी घट झाली आहे.

‘ईपीएस’ 95 नॅशनल मूव्हमेंट कमिटी देशभरात आंदोलने करून हे मुद्दे सक्रियपणे मांडत आहे. या निवृत्तीवेतनधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी, 2008-2009 मध्ये विश्व समिती, 2013 मध्ये भगतसिंह कोश्यारी समिती आणि 2018 मध्ये उच्चाधिकार संनियंत्रण समिती यासह अनेक समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. असे असतानाही या समित्यांच्या शिफारशींची सरकारने अंमलबजावणी केली नाही.

‘ईपीएस’ 95 पेन्शनधारकांना सध्या भांडवली तरतुदीचा परतावा न मिळणे, पेन्शनच्या रकमेचे अपुरे मूल्यांकन आणि योग्य मंजुरीशिवाय उच्च निवृत्तीवेतन पर्याय मागे घेणे यासारख्या महत्त्वपूर्ण समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 55 लाख कोटी रुपयांच्या पुरेशा निधीच्या ‘ईपीएस’ 95 योजनेसाठी निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे.

बजेटमध्ये आवश्यक तरतुदींसह किमान नऊ हजार रुपये पेन्शन देण्यासाठी कायदा करण्यात यावा. ईपीएफओने जारी केलेले 31 मे 2017 चे अंतरिम सल्लागार पत्र मागे घ्यावे. 23 मार्च 2017 च्या EPFO परिपत्रकानुसार जास्त पेन्शनची तरतूद करावी. सर्व ‘ईपीएस’ 95 निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत वैद्यकीय सुविधांची तरतूद तसेच या योजनेत समाविष्ट नसलेल्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांसह त्यांना नऊ हजार रुपये पेन्शन द्यावे.

कोश्यारी समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी अशी मागणी खासदार बारणे यांनी केली. सरकार सकारात्मक असून लवकरच पेन्शनधारकांना दिलासा मिळेल, अशी ग्वाही मांडविया यांनी दिल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात आमसभा आयोजित करण्याची मागणी ; शिवसेनेकडून प्रशासनाला निवेदन । Maval News
– वडगावातील तरूणाईत वाढत्या व्यसनाधीनतेमागे शहरातील अवैध धंदे ; पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी
– पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी बिगर कर्जदार आणि कर्जदार शेतकऱ्यांसाठी मुदतवाढ ; जाणून घ्या


Previous Post

मुंबई-पुणे फास्ट ट्रॅक प्रकल्पाचा सर्व्हे करा, लोणावळा ते पुणे दुपारची लोकल पुन्हा सुरु करा; खासदार बारणे यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

Next Post

विविध योजनांच्या लाभासाठी ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांना नाव नोंदणीचे आवाहन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Auto-Rickshaw

विविध योजनांच्या लाभासाठी ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांना नाव नोंदणीचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lost gold chain found based on CCTV footage and digital transactions Vadgaon Maval police

सीसीटीव्ही फुटेज अन् डिजिटल व्यवहारांच्या आधारे घेतला हरविलेल्या सोन्याच्या चैनचा शोध ; वडगाव मावळ पोलिसांच्या कामगिरीचे होतंय कौतूक

March 20, 2026
Accident

गुढीपाडव्याला लोणावळ्यात पाहिलेला सुर्योदय ठरला शेवटचा… भीषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू

March 20, 2026
Pune Zilla Parishad Virdhaval Jagdale as President Vivek Walse-Patil as Vice President

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड ; अध्यक्षपदी विरधवल जगदाळे, उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील

March 20, 2026
Shiva devotees send message of fort conservation by erecting Gudhi at Tikona Fort Maval

Tikona Fort Maval : किल्ले तिकोणा गडावर गुढी उभारून शिवभक्तांकडून गडसंवर्धनाचा संदेश

March 20, 2026
Illegal-Liquor

परवानगीशिवाय हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द करण्यात येणार – गृह राज्यमंत्री

March 20, 2026
E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.