व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबई-पुणे फास्ट ट्रॅक प्रकल्पाचा सर्व्हे करा, लोणावळा ते पुणे दुपारची लोकल पुन्हा सुरु करा; खासदार बारणे यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

खासदार बारणे यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांची दिल्लीत भेट घेतली. मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वे संदर्भातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 6, 2025
in ग्रामीण, ग्रामीण, देश-विदेश, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
Conduct survey of Mumbai-Pune fast track project resume afternoon local train from Lonavala to Pune

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुंबई-पुणे फास्ट ट्रॅक प्रकल्पाचा सर्व्हे करुन डीपीआर लवकर पूर्ण करावा. हा प्रकल्प मुंबई-पुणे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि प्रवाशांना सुलभ करणारा ठरणारा आहे. दोन्ही शहरांमधील वाढती वाहतूक आणि रेल्वेवरचा ताण लक्षात घेता, फास्ट ट्रॅक सेवा ही काळाची गरज आहे. तसेच पुणे-लोणावळा ते पुणे ही दुपारी दीड वाजताची लोकल आणि कोरोना काळात बंद केलेले थांबे पुन्हा सुरु करावेत, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली.

खासदार बारणे यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांची दिल्लीत भेट घेतली. मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वे संदर्भातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. दीड वाजताची लोकल आणि कोरोना काळात बंद केलेले थांबे पुन्हा सुरु करण्याची ग्वाही वैष्णव यांनी दिली.

याबाबतचे सविस्तर निवेदन खासदार बारणे यांनी रेल्वेमंत्र्यांना दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पुणे औद्योगिक, व्यापार, शैक्षणिक हब आहे. प्रवाशांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. मुंबई-पुणे कॉरिडॉरअंतर्गत पनवेल, तळोजा, तळेगाव, चाकण, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी ही औद्योगिक क्षेत्र येत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचे योगदान देत आहेत. या भागात मालवाहतूक रेल्वे मार्ग बनविण्याची मागणी आहे. मुंबई-पुणे मार्गावर नवीन रेल्वे मार्गाची आवश्यकता आहे. त्यासाठी मुंबई-पुणे फास्ट ट्रॅक प्रकल्पाचा सर्व्हे करुन डीपीआर लवकर पूर्ण करावा. हा मार्ग झाल्यास पश्चिम महाराष्ट्र, मुंबईच्या कनेक्टिव्हीटीला बळ मिळेल.

कोरोना काळात लोणावळा-पुणे लोकलचे नियोजन बदलले होते. दुपारच्या वेळेत लोकल धावत नाही. त्याचा विद्यार्थ्यांना, शिफ्ट ड्युटी करणाऱ्या कामगारांना, विविध कार्यालयीन किंवा वैयक्तिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे. त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

विद्यार्थ्यांसह कामगारांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी दुपारी दीड वाजताची पुणे-लोणावळा लोकल सेवा नियमित सुरू ठेवावी. कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचे मावळ लोकसभा मतदारसंघातील स्थानकांवरील थांबे पुन्हा सुरू करण्यात यावेत. या थांब्यांमुळे केवळ प्रवाशांना सुविधा मिळणार नाही, तर या स्थानकांची आर्थिक व प्रशासकीय महत्त्वही वाढणार आहे.

पुणे-लोणावळा दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या कामाला गती द्या :
पुणे ते लोणावळा या लोकलमधून दररोज एक लाख नागरिक प्रवास करत आहेत. पुणे-लोणावळा लोहमार्गावरील रेल्वे गाड्या दोन ट्रॅकवरून धावत आहेत. या मार्गावर तिसर्‍या आणि चौथ्या ट्रॅकसाठी 2017 मध्ये मान्यता दिली आहे. याबाबतचा सर्व्हेही झाला आहे. ट्रॅक उभारण्यासाठी रेल्वे विभागाकडे जमीनही उपलब्ध आहे. पुणे-लोणावळा दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या कामाला आवश्यक ती गती मिळत नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या ट्रॅकचे काम पूर्ण झाल्यास पुणे आणि मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक अधिक जलद व सुगम होईल. त्यामुळे या कामाला गती देण्याची मागणीही खासदार बारणे यांनी केली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात आमसभा आयोजित करण्याची मागणी ; शिवसेनेकडून प्रशासनाला निवेदन । Maval News
– वडगावातील तरूणाईत वाढत्या व्यसनाधीनतेमागे शहरातील अवैध धंदे ; पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी
– पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी बिगर कर्जदार आणि कर्जदार शेतकऱ्यांसाठी मुदतवाढ ; जाणून घ्या


dainik maval jahirat

Previous Post

जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत वेश्या व्यवसाय तेजीत ! तळेगाव, वडगाव, देहूरोड, सोमाटणे हद्दीत अनेक अड्डे ; पोलिसांचे पाहूनही दुर्लक्ष

Next Post

सेवानिवृत्त ‘ईपीएस’ कर्मचारी पेन्शनधारकांना लवकरच मिळणार दिलासा ; रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांचे आश्नासन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Retired EPS employees pensioners will get relief soon Minister Mansukh Mandaviya statement

सेवानिवृत्त ‘ईपीएस’ कर्मचारी पेन्शनधारकांना लवकरच मिळणार दिलासा ; रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांचे आश्नासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Issue of Patan landslide victims raised directly with Minister girish mahajan through Bala Bhegade initiative

पाटण दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर ; बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने बाधितांना त्वरित मदत, सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रशासनाला निवेदन

August 7, 2026
Vadgaon Maval Demand for installation of CCTV cameras an open gym at Morya Chowk in Dhorewada

वडगाव मावळ : ढोरेवाडा येथील मोरया चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि ओपन जीम उभारण्याची मागणी

August 7, 2026
NCP protests in Talegaon Dabhade against alleged remarks made about DCM Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अपमानास्पद वक्तव्याचा तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

August 7, 2026
Setback for NCP in Talegaon Dabhade city Majnu Natekar councilor membership cancelled

तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका ! मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द

August 7, 2026
Major achievement by Lonavala Police Stolen property seized accused arrested from Kalyan

लोणावळा पोलिसांची मोठी कामगिरी ; २.२९ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त, आरोपीला कल्याणमधून अटक

August 7, 2026
Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.