मावळ लोकसभेचे संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांनी आज गुरुवार (दि. 30 नोव्हेंबर) रोजी लोणावळा नगरपरिषद इथे आढावा बैठक घेतली. शहरातील विविध विकासकामांचा आढावा खासदार बारणे यांनी घेतला. तसेच, प्रत्यक्ष चालू कामांच्या ठिकाणी भेट देऊन पाहाणी देखील केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
बैठकीपूर्वी बारणे यांनी लोणावळा रेल्वे स्टेशन इथे सुरु असलेल्या सुशोभिकरणाचा आणि विस्तारीकणाच्या कामाची पाहणी केली. तसेच, शहरातील प्रलंबित आणि सुरु असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेऊन प्रलंबित असलेली कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. ( Review of development works in Lonavala by MP Shrirang Barane maval )
यावेळी भाजपाचे प्रचार प्रमुख रविंद्र भेगडे, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, आरपीआय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडभोर, भाजपा लोणावळा शहर अध्यक्ष अरुण लाड, आरपीआय लोणावळा शहर अध्यक्ष कमलसिंग म्हस्के, शहरातील सर्व माजी नगरसेवक, मुख्याधिकारी साहेब, सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ‘खासदार साहेब… मावळवासियांना दिलासा द्या, पुणे – लोणावळा लोकल ट्रेनची सेवा नियमितपणे सुरू करा’
– पीएम किसान योजनेचा 15वा हफ्ता मिळाला नाही? ‘या’ नंबरवर लगेच करा फोन । PM Kisan Samman Nidhi
– निबंध स्पर्धेत 6 शाळांमधून प्रगती विद्यामंदिर शाळेतील मंगेश राठोडचा प्रथम क्रमांक, इनरव्हील क्लबचा उपक्रम