व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पीएम किसान योजनेचा 15वा हफ्ता मिळाला नाही? ‘या’ नंबरवर लगेच करा फोन । PM Kisan Samman Nidhi

पीएम किसान हि देशातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची योजना आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने 2019 योजनेची सुरुवात केली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 30, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र
PM-Kisan-Samman-Nidhi

Photo Courtesy : Team Dainik Maval


पीएम किसान हि देशातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची योजना आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने 2019 योजनेची सुरुवात केली. तेव्हापासून आजतागायत ही योजना सुरु आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजाराचा लाभ पुरवला जात आहे. तीन टप्प्यात प्रत्येकी 2 हजार असे सहा हजार रुपयांचे वितरण केले जाते. दर चार महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होतात. आतापर्यंत योजनेचे एकूण 15 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

योजनेतील चौदावा हप्ता राजस्थान येथील एका कार्यक्रमातून दिनांक 27 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला होता. तर, यानंतरचा पंधरावा हप्ता 15 नोव्हेंबर रोजी छत्तीसगड येथील एका कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वितरित केला. एकंदरीत पंधरावा हप्ता वितरित होऊन जवळपास पंधरा दिवसांचा काळ उलटला आहे. परंतू अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पंधराव्या हफ्त्याचे पैसे जमा झाले नसल्याचे समजत आहे. हे शेतकरी असे आहेत ज्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे, मात्र त्यांना दोन हजार रुपये मिळालेले नाहीत.

परंतू, संबंधित काही शेतकऱ्यांकडून पीएम किसानचा लाभ का मिळाला नाही, हा प्रश्न आहे. जर तुम्हीही त्यापैकी एक असाल आणि पीएम किसान योजनेला पात्र असूनही पंधरावा हफ्ता तुम्हाला मिळाला नसेल, तर पीएम किसानच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तुम्ही याची माहिती जाणून घेऊ शकता. ( PM Kisan Samman Nidhi Installment Status Check Call On This Toll Free Number or Mail Id )

पैसे खात्यात जमा न व्हायची कारणे कोणती?

प्राप्त माहितीप्रमाणे, बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक नसणे, ई-केवायसी केलेली नसणे यामुळे या योजनेचा हप्ता अटकू शकतो. याशिवाय जर पीएम किसान योजनेमध्ये अर्ज करताना जेंडर, नाव, आधार नंबर, पत्ता जर चुकीचा टाकला गेला असेल तरीसुद्धा या योजनेचा हप्ता रोखला जाऊ शकतो.

कुठे संपर्क करावा?

तुम्ही ई-केवायसी, आधार सीडींग केलेली असेल आणि तुमचा अर्ज देखील बरोबर असेल, तरीही तुम्हाला योजनेचा पंधरावा हफ्ता मिळाला नसल्यास तुम्ही पीएम किसानच्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधू शकता. तसेच, तुम्ही पीएम किसानच्या ईमेल आयडीवर तुमची तक्रार नोंदवू.

पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक – 155261
पीएम किसान टोल फ्री क्रमांक – 1800115526
पीएम किसान फोन नंबर – 011-23381092
ईमेल आयडी – pmkisan-ict@gov.in
पीएम किसान योजनेतील लाभार्थी यादीतील नाव चेक करा – https://pmkisan.gov.in/

अधिक वाचा –
– डावजे-कातवडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी बंडू जंगम बिनविरोध, गावकऱ्यांकडून खास सन्मान
– अवकाळीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ते झोपडीधारकांना मोठा दिलासा; वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय
– कामाची बातमी! ग्रामपंचायतीमधून कोणकोणते दाखले मिळतात माहितीये का? ‘या’ दाखल्यांसाठी तर पैसेही द्यावे लागत नाही


dainik maval jahirat

Previous Post

निबंध स्पर्धेत 6 शाळांमधून प्रगती विद्यामंदिर शाळेतील मंगेश राठोडचा प्रथम क्रमांक, इनरव्हील क्लबचा उपक्रम

Next Post

‘खासदार साहेब… मावळवासियांना दिलासा द्या, पुणे – लोणावळा लोकल ट्रेनची सेवा नियमितपणे सुरू करा’

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pune-Lonavla-Local

'खासदार साहेब... मावळवासियांना दिलासा द्या, पुणे - लोणावळा लोकल ट्रेनची सेवा नियमितपणे सुरू करा'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.