व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘खासदार साहेब… मावळवासियांना दिलासा द्या, पुणे – लोणावळा लोकल ट्रेनची सेवा नियमितपणे सुरू करा’

पुणे लोणावळा लोकल ट्रेनची सेवा नियमितपणे सुरू करण्यात यावी, यासाठी मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना निवेदन देण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 30, 2023
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
Pune-Lonavla-Local

File Photo : Pune Lonavla Local


पुणे लोणावळा लोकल ट्रेनची सेवा नियमितपणे सुरू करण्यात यावी, यासाठी मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना निवेदन देण्यात आले. खासदार बारणे यांनी पुणे लोणावळा लोकल ट्रेनची सेवा त्वरित सुरू करण्यासंदर्भात संबंधित विभागाची बैठक बोलावून मावळ वासीयांना दिलासा द्यावा, असे निवेदनात नमूद केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

मावळचे खासदार या नात्याने श्रीरंग बारणे यांनी सदर प्रश्न त्वरित सोडवून विद्यार्थी, चाकरमानी, कामगार वर्ग, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, व्यापारी, व बहुसंख्य महिला वर्गाला दिलासा द्यावा असे मावळ तालुका काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी व्यक्त केली आहे. कोविड काळात पुणे लोणावळा लोकल सेवा खंडित झाली होती, नियमित लोकल ट्रेनच्या फेऱ्या रद्द करून कोविड नियमावलीनुसार लोकल ट्रेनच्या फेऱ्या सोडण्यात येत होत्या. ( Maval Congress demand to start Pune Lonavla local train regularly )

परंतु कोविड उलटून जनजीवन सुरळीत झाले तरीही पुणे लोणावळा लोकल ट्रेन सेवा सुरळीत झाली नाही. त्यामुळे ट्रेन अभावी अनेक नागरिकांची गैरसोय होत आहे. दुपारी बारा ते चार च्या दरम्यान कुठलीच लोकल ट्रेनची सेवा उपलब्ध नसल्यामुळे, पुन्हा सुरळीतपणे सर्व लोणावळा पुणे लोकल ट्रेनच्या फेऱ्या व्हाव्यात यासाठी लोकसभेत लक्षवेधी प्रश्न मांडावा असे निवेदनात नमूद केले आहे. याप्रसंगी मावळ तालुका काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत, कार्याध्यक्ष योगेश पारगे, युवक अध्यक्ष समीर दाभाडे, ॲड.निवृत्ती फलके, ॲड राम शहाणे, नगर सेवक रोहित लांघे, दत्ता पारगे आदी मान्यवर उपस्थित होते.

“पुणे लोणावळा लोकल ट्रेन सेवा नियमितपणे सुरू करण्यासाठी संबंधित विभागाला सूचना दिलेल्या आहेत. तसेच पुन्हा संबंधित विभागाची उच्चस्तरीय बैठक लवकरात लवकर घेऊन सदर प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.” – खासदार श्रीरंग आप्पा बारणे

अधिक वाचा –
– ‘शिवाजीनगरपर्यंत स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचं स्वागत, पण सरकार लोकल्ससाठी स्वतंत्र मार्गिकेचा विचार का करत नाही?’
– डावजे-कातवडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी बंडू जंगम बिनविरोध, गावकऱ्यांकडून खास सन्मान
– अवकाळीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ते झोपडीधारकांना मोठा दिलासा; वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय


dainik maval jahirat

Previous Post

पीएम किसान योजनेचा 15वा हफ्ता मिळाला नाही? ‘या’ नंबरवर लगेच करा फोन । PM Kisan Samman Nidhi

Next Post

देहू इथे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना सायकल आणि स्कूल बॅगचे वाटप

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Bicycles-Distribution-Students

देहू इथे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना सायकल आणि स्कूल बॅगचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.