मावळ तालुका हा भागाचे कोठार म्हणून ओळखला जातो. मावळच्या सुवासिक इंद्रायणी तांदळाची चव जगभरात प्रसिद्ध आहे. सध्या मान्सून सुरू झाला आहे. मावळ तालुक्यात शेतशिवारात भाताची रोपे तरारताना दिसत आहेत. सोबतच कृषि विभागाने राबवलेल्या खास ‘कृषि संजिवनी मोहिमे’अंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी खुप अगोदरच भाताची पेरणी केली होती, त्यांच्या शेतात भाताची रोपे चांगलीच वाढली असून शेतकऱ्यांनी भात लागवड देखील सुरू केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पवन मावळ भागातील मौजे येळसे गावातील प्रगतशील शेतकरी रमेश आडकर यांच्या शेतात सध्या भात लागवड सुरू आहे. कृषी विभागाच्या कृषी संजिवनी मोहिमेअंतर्गत येळसे गावातील शेतकऱ्यांना भात लागवडीबाबत आधुनिक पद्धतीची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी मान्सूनच्या आगमनाची वाट न पाहता पेरणी करून बाह्य पाणीपुरवठा करून भाताची रोपे वाढवली. ही रोपे आता चांगलीच वाढली असून पाणीपुरवठा करून शेतकरी भात लागवड करत आहेत. आता कोसळणारा मान्सून हा अशा शेतकऱ्यांच्या भातपिकाला अधिक फायदेशीर ठरतो, असे शेतकरी सांगतात. ( Rice cultivation started in Yelse village success of agriculture revival campaign Maval Taluka )
भात लागवड सुरू असतानाच कृषि सहाय्यक विकास गोसावी, मंडळ कृषी अधिकारी काळेकॉलनी प्रशांत डहाळे आणि कृषी पर्यवेक्षक नागनाथ शिंदे यांनी भातशिवारात भेट दिली. सुयोग्य पद्धतीने लागवड सुरू असल्याचे निश्चित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
‘मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी भात लागवड करतात. परंतू अधिकाधिक शेतकरी पारंपारिक पद्धतीने भात लागवड करण्यास प्राधान्य देत होते. कृषी विभागामार्फत आता शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून भात उत्पदनाच्या आधुनिक पद्धतीचा प्रसार करण्यात आला आहे,’ अशी माहिती कृषी सहाय्यक विकास गोसावी यांनी दिली.
अधिक वाचा –
– 1972 साली धरण झाले, 7 आमदार झाले, मात्र पवना धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागायला 2024 साल उजाडले । Pavana Dam
– पुणे रिंगरोड बाबत महत्वाची बातमी ! ‘एमएसआरडीसी’कडून प्रकल्पाबाबत महत्वाची अपडेट समोर । Pune Ring Road
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 161 इमारती धोकादायक । Talegaon Dabhade