Dainik Maval News : भाताचे आगार अशी ओळख असणाऱ्या मावळ तालुक्यात साधारणतः जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच भात लावणीला सुरुवात होते. भात लागवड करत असताना मावळ तालुक्यात सध्या अनेक आधुनिक पद्धतींचा आणि तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याचे दिसत आहे. ( Rice Is Being Cultivated In Maval Taluka Using Modern Methods )
पूर्वीपासून पारंपारिक पद्धतीने चालत आलेल्या भात लागवडीची कामे ही महिला भगिनी व पुरुष मंडळी एकमेकांच्या मदतीने करत होती. त्यावेळेस सर्वांच्या माध्यमातून शेती कामे केली जायची. कारण यंञसामुग्री त्यावेळेस नव्हती. कामे ही पडकई म्हणजेच चार-पाच शेतकरी एकत्र येऊन एकमेकांच्या मदतीने भात शेतीची कामे मोठ्या उत्साहाने करत असायचे. त्यामुळेच भात लागवडीसाठी मोठी मदत एकमेकामधुन होत असे आणि भात लागवडी पटकन वेळेत उरकली जात होती.
त्यावेळी बैलांनी चिखलणी करणे जायचे. मात्र आज बैलांची जागा टॅक्टरने घेतली. नांगरटीसह, भात चिखलणी सर्वच कामे टॅक्टरने होवु लागली आहेत. चाळीस -पन्नास वर्षापूर्वी पावसाचे प्रमाणही जास्त असायचे, जास्त म्हणजे जवळपास दहा-दहा दिवस एकही माणुस घरातुन बाहेर पडत नव्हता आणि म्हणून पावसापासून संरक्षण करण्यासाठी ईरले व भाताचे रोपे उपटण्यासाठी टिवक्याचे प्रमाण हे जास्त असायचे. परंतु आता ह्या जुन्या पद्धतीच्या उपकरणाने कामे कमी होत चालली आहे.
- बैल आणि औताचं प्रमाण ही कमी होत चाललंय. निसर्गाचा लहरीपणा, तरुणाईची शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. आता शेतीही आधुनिक पद्धतीने करण्यावर शेतकरी भर देऊ लागले आहेत. भात शेती मध्ये ट्रॅक्टर ला खूप महत्व आले आहे. शेतकरी चिखलणी ट्रॅक्टरने करून मावळ तालुक्यात काही ठिकाणी यंत्राने ही लागवड केली जात आहे. ईरण्याची जागा आता प्लॅस्टिक रेनकोटने घेतली आहे, तर टिवक्याची जागा ही मोकळ्या तेल डब्यांनी घेतली आहे. गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त जुन्या आठवणी हे उद्गार गावातील वयोवृद्ध काढत आहे.
पारंपरिक भातशेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत मावळ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी चारसूत्री, सगुणा राईस तंत्रज्ञान (एसआरटी), यंत्राने भात लागवड पूर्ण करून भात पेरणीचा आणि लागवडीचा प्रश्नच मिटवला आहे. त्याकामी कृषि विभागाचे मोलाचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळत आहे. तालुक्यात एकूण क्षेत्राच्या जवळपास 45 ते 50 टक्के क्षेत्र हे सुधारित लागवड पद्धतीने लावले जाते. शेतकऱ्यानी भात लागवडीवर होणार वारेमाप खर्च व लागवडीच्या वेळी जाणवणारी मजुरांची चणचण यावर मात केली आहे. नवनवीन भाताचे वाण, नवनवीन भात लागवडीच्या पद्धतीमुळे भात उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. मावळ तालुक्यात नवनविन तंञज्ञानावर आज शेतकरी काम करत आहे. मनुष्य बळाचा कमी वापर करताना आज जुन्या पध्दती नामशेष होऊ लागल्या आहेत. बदलते स्वरूप अंगीकारणे गरजेचे आहे आणि ते शेतक-यांनी आपल्या शेतीत केले. ( Rice Is Being Cultivated In Maval Taluka Using Modern Methods )
शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती केली पाहिजे. भात लागवड चारसूत्री, एस.आर. टी तंत्राने करून युरिया ब्रिकेट खताचा वापर करून उत्पादनात वाढ होईल ह्यासाठी प्रयत्न करावेत. पीक विमा भरावा, ई पीक पाहणी करावी. मावळ तालुक्यातील शेतकरी आधुनिक शेती तंत्रज्ञान वापरून शेती करू लागले आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची घोषणा ! तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य स्तरावर राबविणार अभियान
– ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारचे महत्वाचे पाऊल ! महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी उभारणार ‘उमेद मॉल’
– अवकाळीमुळे बाधित झालेल्या ३ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना मदतीपोटी ३३७ कोटी ४१ लाखाच्या निधीस मान्यता
– पवना हॉस्पिटल आणि मावळ तालुका मराठी पत्रकार संघ आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Maval News