Dainik Maval News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाजवळ रिक्षा घेऊन आलेल्या एकास दोघांनी बांबूने बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. ११ जून) पहाटे घडली. संदीप उल्हास गोडसे (४३, वडगाव मावळ) असे मारहाण झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.
त्यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौतम विष्णू शिंदे (४५, आंबी मावळ), संजय आम्रता शिंदे (४२, वडगाव मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप गोडसे हे त्यांचे रिक्षा घेऊन मुंबई पुणे द्रुतगती मार्गाजवळ गेले. त्यावेळी आरोपी रिक्षातून तिथे आले. त्यांनी रिक्षातून बांबू काढून संदीप यांना बेदम मारहाण केली. शिवीगाळ करून ‘तू इथे रिक्षा घेऊन यायचे नाही, धंदा करायचा नाही,’ असे म्हणत मारहाण केली. महामार्ग पोलीस घटनास्थळी येत असल्याचे पाहून आरोपी पळून गेले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अहमदाबाद विमान दुर्घटना : विमानातील एक प्रवासी बचावला, उर्वरित सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती, मृतांमध्ये माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश
– एकीवर दोघांचे प्रेम आणि सोळा वर्षीय मुलाची हत्या… देहूरोड हादरलं ! भेटायला बोलावलं आणि चाकूने भोकसलं । Dehu Road Crime
– आमदार सुनील शेळके यांच्या आदेशानंतर देहू नगरपंचायत प्रशासनाची तातडीने कारवाई ; रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविली । Dehu News