मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या सुमारे वीस लक्ष रुपये निधीतून माळवाडी येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते वराळेकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे कामाचा शुभारंभ शनिवार (दिनांक 2 ऑगस्ट) रोजी संपन्न झाला. ( road concreting work started at malwadi talegaon dabhade )
तळेगाव दाभाडे शहरालगत असणाऱ्या माळवाडी परिसरात नागरिकीकरण वाढत आहे. त्यामुळे या भागातील वाढत्या रहदारीचा विचार करुन हा रस्ता करण्याची ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून मागणी होती. माळवाडी गावात कॉंक्रिटचा पक्का रस्ता होऊन कायमस्वरुपी समस्या मिटणार असल्याने ग्रामस्थांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार व्यक्त केले.
ह्या भूमिपूजन समारंभास सरपंच पल्लवी दाभाडे, उपसरपंच रेश्मा दाभाडे,सदस्य दिपक दाभाडे, पूजा दाभाडे,पल्लवी मराठे,जयश्री गोटे, पूनम आल्हाट,मनीषा दाभाडे,सचिन शेळके, विदुर पचपिंड,सुधीर आल्हाट, ग्रामविकास अधिकारी जीएस खोमणे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मोठी बातमी! पवनानगर भागातील प्रसिद्ध कृषी व्यवसायिकाच्या घरी 14 लाखांची घरफोडी, परिसरात खळबळ
– बहुचर्चित येळसे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बायडाबाई कालेकर; 50 वर्षांत पहिल्यांदाच शेवती वसाहतला सरपंचपदाचा मान
– वैकुंठवासी मृदंगमणी दत्तोबा महाराज शेटे यांचे पुण्यस्मरण आणि गुरुपौर्णिमा निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान