मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या सुमारे 86 लक्ष निधीतून सुदुंबरे मुख्य रस्ता ते ठाकर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ गुरुवारी (दिनांक 30 नोव्हेंबर) संपन्न झाला. सुदुंबरे परिसरात औद्योगिक क्षेत्र, शैक्षणिक संस्था यामुळे नागरिकीकरण वाढत आहे. परंतू, इथे असणारी ठाकर वस्ती मात्र मुलभुत सुविधांपासून वंचित होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ठाकर वस्तीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. काही महिन्यांपूर्वी जातीचे प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी आमदार सुनिल शेळके आले असताना वस्तीवरील नागरिकांनी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली होती. याची दखल घेत शेळके यांनी तात्काळ निधी उपलब्ध करुन कामाची सुरुवात केल्याने नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत. ( road work in sudumbare village through MLA Sunil Shelke )
“आमदार सुनिल शेळके यांनी सुदुंबरे गावासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. ठाकर वस्तीकडे जाणारा रस्ता होणे आवश्यक होते. त्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध केल्याने ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानते.” – लोकनियुक्त सरपंच मंगल गाडे
सदर कार्यक्रमाला उपसरपंच बापू बोरकर, ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण गाडे, ताराचंद गाडे, राहुल गाडे,गोविंद मेंढाळे, सुनंदा गाडे, सविता गाडे, अलका गाडे, सुभद्रा गाडे सुषमा गाडे, उद्योजक कालिदास गाडे, राजेंद्र गाडे, मोहन काळडोके, सुरेश गाडे, रामदास गाडे, उत्तम गाडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जालिंदर गाडे, तालुका उपाध्यक्ष माणिक गाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस सुदुंबरे अध्यक्ष संतोष गाडे, नवनाथ गाडे, चेअरमन संदीप काळडोके,भरत गाडे, हिरामण गाडे, पोलिस पाटील सुनिल गाडे, नितीन गाडे, माधुरी गाडे, ग्रामसेविका सतीका शिंदे, वैजयंता गाडे, सुरेखा गाडे आदि. उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मावळमध्ये शरद पवार गटाकडून संघटन बांधणीवर जोर! तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदी ‘या’ झुंजार नेतृत्वाची नियुक्ती
– मावळमधून महायुतीचा उमेदवार मीच… आणि विजय देखील माझाच! खासदार श्रीरंग बारणेंचा यल्गार
– आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून आंदर मावळातील रस्त्यासाठी 1 कोटी 90 लाखाची निधी