मावळ तालुक्यातील प्रसिद्ध भंडारा डोंगर परिसरात दरोडा टाकणाऱ्या टोळीतील 5 जणांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 3 देशी बनावटीचे कट्टे, सहा राऊंड, एक लोखंडी कोयता, सहा मोबाईल आणि 2 दुचाकी असा एकूण 97 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 5 आणि तळेगाव एमआयडीसी पोलिस यांच्या पथकाने ही संयुक्त कामगिरी केली. ( robbery gang jailed with weapons in bhandara dongar area of maval taluka )
निरज भिकमसिंग सेन (वय 21, रा. तळेगाव स्टेशन, तळेगाव दाभाडे, मूळ रा. बौरावती, ता. शेहपूर, जि. धौलपूर, राजस्थान), योगेश सोरंग माहोर (20, रा. तळेगाव दाभाडे, मूळ रा. आरुआ, ता. बाडी, जि. धौलपूर, राजस्थान), सुनील ओमीप्रकाश माहोर (19, रा. तळेगाव दाभाडे, मूळ रा. मिडाकूर, ता. मलपुरा, जि. आग्रा, उत्तरप्रदेश), श्यामसिंग मुन्नीलाल कोली (35, रा. तळेगाव दाभाडे, मूळ रा. अरुआ, पो. मरहोलीता, ता. बाडी, जि. धौलपूर, राजस्थान), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह एका बालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा डोंगराच्या पायथ्याला कमानीजवळ सुदवडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला 5 जण अंधारात संशयितरित्या थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून 5 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे 3 देशी बनावटीचे कट्टे, 6 राऊंड, 1 लोखंडी कोयता, 6 मोबाइल आणि दोन दुचाकी असा 97 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडील दुचाकी व एक मोबाइल माळवाडी ते वराळे रस्त्यावर एका व्यक्तीला मारहाण करून चोरी केली असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. तसेच त्यांच्याकडील दुसरी दुचाकी ही गुन्हा करताना वापरली असल्याचेही सांगितले. दुचाकी चोरीप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज खंडाळे, तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज पांडे, पोलिस उपनिरीक्षक राहुल कोळी, पंडीत आहिरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. ( robbery gang jailed with weapons in bhandara dongar area of maval taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– गौरी-गणपतीसाठी सरकारकडून 100 रुपयात मिळणार ‘आनंदाचा शिधा’, पाहा कधी आणि कुणाकुणाला मिळणार शिधा?
– स्वातंत्र्यानंतर प्रथमच उंबरवाडीतील कातकरी बांधवांना मिळाले जातीचे दाखले; आमदार शेळकेंचे मानले आभार
– वडगाव साखळी रस्त्याच्या कामाबाबत नगरपंचायत प्रशासन ऍक्टिव्ह मोडमध्ये; रस्त्याला अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार