मावळ तालुक्यातील कान्हे-नायगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रोहिणी अंकुश चोपडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मावळते उपसरपंच आरिफ मुलाणी यांनी त्यांच्या पदाचा ठरवलेला कार्यकार पुर्ण केल्याने पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी पुन्हा निवडप्रकिया राबवण्यात आली. यात रोहिणी चोपडे यांची उपसरपंचपदी निवड झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अरिफ मुलाणी यांच्या राजीनाम्यानंतर सरपंच विजय वामन सातकर यांच्या अध्यक्षतेखाली रिक्त उपसरपंच पदासाठी विशेष सभा बोलावण्यात आली. ग्रामसेवक संतोष शिंदे यांनी यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. यावेळी निर्धारित वेळेत रोहिणी अंकुश चोपडे यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष शिंदे यांनी रोहिणी चोपडे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केली. ( Rohini Chopde Elected as deputy sarpanch of Kanhe Naigaon Group Gram Panchayat Maval News )
रोहिणी चोपडे यांच्या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. ग्रामस्थांच्या उपस्थितीत चोपडे यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत सरंपच विजय वामन सातकर, माजी उपसरपंच आरिफ मुलाणी, सुजाता सुनिल चोपडे, सोपान धिंदळे, गिरिष सातकर, किशोर सातकर, महेश सातकर, आशा सातकर, रुपाली कुटे, संदिप ओव्हाळ, बाबाजी चोपडे, सोनाली सातकर, अश्विनी शिंदे, मनीषा ओव्हाळ, पुजा चोपडे आदीजण यावेळी उपस्थित होते.
रोहिणी चोपडे यांची उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बापू भेगडे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सारिका सुनिल शेळके, रघुनाथ चोपडे, माजी चेअरमन किशोर सातकर, दिलीप म्हाळसकर, मदन वाजे, समीर काळभोर आदी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ‘शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात बियाणे, खतांचा पुरवठा करा; प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज मिळण्याची दक्षता घ्या’ – अजित पवार
– नरेंद्र मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर ! अनेकांची जुनी खाती कायम, कुणाला कोणतं खातं मिळालं? एका क्लिकवर पाहा यादी
– द्रुतगतीमार्गावर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात ! टेम्पो चालक गंभीर । Mumbai Pune Expressway