व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नरेंद्र मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर ! अनेकांची जुनी खाती कायम, कुणाला कोणतं खातं मिळालं? एका क्लिकवर पाहा यादी

सोमवारी पंतप्रधान मोदींनी त्यांच्यासोबतच शपथबद्ध झालेल्या 71 खासदारांची अर्थात नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठकही घेतली. या बैठकीत नव्या मंत्र्यांचे खातेवाटप देखील करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 11, 2024
in देश-विदेश
PM Narendra Modi Cabinet

Photo Courtesy : X


Narendra Modi Cabinet Portfolios Allocated : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 9 जून) तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर सोमवारी लगेचच त्यांनी पदाचा कार्यभार हाती घेतला, त्यासोबत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णयही घेतला. सोमवारी पंतप्रधान मोदींनी त्यांच्यासोबतच शपथबद्ध झालेल्या 71 खासदारांची अर्थात नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठकही घेतली. या बैठकीत नव्या मंत्र्यांचे खातेवाटप देखील करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात जुन्या आणि महत्वाच्या नेत्यांकडील खाती कायम ठेवण्यात आली आहेत. अमित शाह यांच्याकडे गृह आणि सहकार खाते कायम ठेवण्यात आले आहे. तर राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण खाते, निर्मला सीतारामण यांच्याकडे अर्थ खाते, एस. जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र खाते आणि नितीन गडकरी यांच्याकडील रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्रालय कायम ठेवण्यात आले आहे. मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राला फक्त दोन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली. एक नितीन गडकरी जे की भाजपाचे आहेत, आणि दुसरे पीयुष गोयल तेही भाजपाचे आहेत. याव्यतिरिक्त रक्षा खडसे (भाजपा), मुरलीधर मोहोळ (भाजपा), प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट), रामदास आठवले (आरपीआय) हे राज्यमंत्री आहेत. मुरलीधर मोहोळ हे आता सहकार राज्यमंत्री म्हणून अमित शाह यांच्यासोबत काम करतील. ( PM Narendra Modi Cabinet Portfolios Allocated See List NDA Modi Government 3.O )

कॅबिनेट मंत्री आणि त्यांना मिळालेली खाती
राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री
अमित शाह – गृहमंत्री; सहकार मंत्री
नितीन गडकरी – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
जगत प्रकाश नड्डा – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री; रसायने आणि खते मंत्री
शिवराज सिंह चौहान – कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आणि ग्रामविकास मंत्री
निर्मला सीतारामण – अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री
डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर – परराष्ट्र व्यवहार मंत्री
मनोहर लाल खट्टर – गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री आणि उर्जा मंत्री.
एच. डी. कुमारस्वामी – अवजड उद्योग मंत्री आणि पोलाद मंत्री
पीयूष गोयल – वाणिज्य आणि उद्योग मंत्री
धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्री
जीतन राम मांझी – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री
राजीव रंजन सिंह उर्फ ​​ललन सिंह – पंचायत राज मंत्री आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री
सर्वानंद सोनोवाल – बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री
वीरेंद्र कुमार – सामाजिक न्याय मंत्री
के. आर. नायडू – नागरी विमान वाहतूक मंत्री
प्रल्हाद जोशी – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री
जुआल ओरम – आदिवासी व्यवहार मंत्री
गिरीराज सिंह – वस्त्रोद्योग मंत्री
अश्विनी वैष्णव – रेल्वेमंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री, आणि इलेक्ट्रॉनिक्स तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री
ज्योतिरादित्य सिंधिया – दळणवळण मंत्री, ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्री
भूपेंद्र यादव – पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री
गजेंद्रसिंह शेखावत – सांस्कृतिक कार्य मंत्री आणि पर्यटन मंत्री
अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास मंत्री
किरेन रिजिजू – संसदीय कामकाज मंत्री, अल्पसंख्याक व्यवहार मंत्री
हरदीप सिंग पुरी – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री
मनसुख मांडविय – कामगार आणि रोजगार मंत्री आणि युवा कार्य तथा क्रीडा मंत्री
जी. किशन रेड्डी – कोळसा मंत्री आणि खाण मंत्री
चिराग पासवान – अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री
सी. आर. पाटील – जलशक्ती मंत्री

स्वतंत्र कारभार असलेले राज्यमंत्री आणि त्यांना मिळालेली खाती
राव इंद्रजित सिंह – सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी राज्यमंत्री, नियोजन राज्यमंत्री, सांस्कृतिक विभागाचे राज्यमंत्री.
डॉ. जितेंद्र सिंह – विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री, अणुऊर्जा राज्यमंत्री, अंतराळ विभागातील राज्यमंत्री
अर्जुन राम मेघवाल – कायदा आणि न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री
प्रतापराव जाधव – आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री
जयंत चौधरी – कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि शिक्षण राज्यमंत्री

राज्यमंत्री आणि त्यांना मिळालेली खाती
जितिन प्रसाद – वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री; इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री
श्रीपाद येसो नाईक – ऊर्जा मंत्रालयाचे राज्यमंत्री
पंकज चौधरी – अर्थ राज्यमंत्री.
कृष्ण पाल – सहकार राज्यमंत्री
रामदास आठवले – सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री.
राम नाथ ठाकूर – कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री.
नित्यानंद राय – गृह राज्यमंत्री.
अनुप्रिया पटेल – आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, रसायने आणि खते राज्यमंत्री
व्ही. सोमन्ना – जलशक्ती राज्यमंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री
चंद्रशेखर पेम्मासानी – ग्रामीण विकास राज्यमंत्री आणि दळणवळण राज्यमंत्री.
एस. पी. सिंह बघेल – मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री आणि पंचायती राज राज्यमंत्री
शोभा करंदलाजे – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री आणि कामगार आणि रोजगार राज्यमंत्री
कीर्तिवर्धन सिंह – पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री आणि परराष्ट्र राज्यमंत्री.
बी.एल. वर्मा – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री आणि सामाजिक न्याय तथा सक्षमीकरण राज्यमंत्री
शंतनू ठाकूर – बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री
सुरेश गोपी – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री आणि पर्यटन राज्यमंत्री
डॉ. एल. मुरुगन – माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री
अजय टम्टा – रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री
बंदी संजय कुमार – गृह राज्यमंत्री
कमलेश पासवान – ग्रामीण विकास राज्यमंत्री
भगीरथ चौधरी – कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री
सतीशचंद्र दुबे – कोळसा आणि खणिकर्म राज्यमंत्री
संजय सेठ – संरक्षण राज्यमंत्री
रवनीत सिंह – अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री
दुर्गादास उईके – आदिवासी व्यवहार राज्यमंत्री
रक्षा खडसे – युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री
सुकांता मजुमदार – शिक्षण राज्यमंत्री आणि ईशान्य क्षेत्राच्या विकास विभागाचे राज्यमंत्री
सावित्री ठाकूर – महिला आणि बालविकास राज्यमंत्री
तोखन साहू – गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री
राजभूषण चौधरी – जलशक्ती राज्यमंत्री
भूपती राजू श्रीनिवास वर्मा – अवजड उद्योग राज्यमंत्री आणि पोलाद राज्यमंत्री
हर्ष मल्होत्रा ​​- कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री आणि रस्ते वाहतूक तथा महामार्ग राज्यमंत्री
निमूबेन बांभनिया – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री
मुरलीधर मोहोळ – सहकार राज्यमंत्री आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री
जॉर्ज कुरियन – अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन तथा दुग्धव्यवसाय राज्यमंत्री
पबित्रा मार्गेरिटा – परराष्ट्र राज्यमंत्री आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री

अधिक वाचा –
– अनेक वर्षे रखडलेला प्रश्न मार्गी लागला ! आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते तळेगावात 3 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न
– कुसगावकरांचे स्वप्न पूर्ण ! दत्तवाडी रस्त्यावरील नव्या पुलाचे आमदार शेळकेंच्या हस्ते लोकार्पण, नागरिकांनी व्यक्त केले समाधान
– वडगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पक्षाचा 25वा वर्धापन दिन साजरा । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

द्रुतगतीमार्गावर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात ! टेम्पो चालक गंभीर । Mumbai Pune Expressway

Next Post

‘शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात बियाणे, खतांचा पुरवठा करा; प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज मिळण्याची दक्षता घ्या’ – अजित पवार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
DCM Ajit Pawar

'शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात बियाणे, खतांचा पुरवठा करा; प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज मिळण्याची दक्षता घ्या' - अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.