गोधाम इको व्हिलेजचे अध्यक्ष नितीन घोटकुले यांनी सह्याद्री प्रतिष्ठान यांना किल्ले तुंग (कठिणगड) संवर्धनासाठी 1 लाख रुपयांची देणगी दि होती. या देणगीतून सह्याद्री प्रतिष्ठानकडून तुंग किल्यावर रोप वे बसवण्यात आला आहे. या रोपवेचे उद्घाटन नितीन घोटकुले यांच्या हस्ते करण्यात आले. रविवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता हा सोहळा पार पडला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नागरिकांनी अनावश्यक खर्च टाळून किल्ले संवर्धनासाठी एक पाऊल पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन यावेळी नितीन घोटकुले यांनी केले. हा रोपवे तुंग किल्याची डागडुजी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून याची लांबी 350 मीटर असून एकूण 300 किलो वजन घेऊन जाण्याची क्षमता यात आहे, अशी माहिती सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन शेडगे यांनी दिली. इतिहासकार प्रमोद बोराडे यांनी यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांना तुंग किल्ल्याचा प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास याबाबत माहिती दिली. ( Rope Way at Tung Fort through the relief fund of Nitin Ghotkule )
यावेळी धनंजय टिळे, संदीप घोटकुले, ज्ञानेश्वर ठाकर, चेतन वाघमारे, संदीप जाधव, अभिजित जाधव, भाऊ डाकोल, विकास वाघमारे, किशोर वाघमारे, राजेंद्र सातपुते, मनीष पुनमिया, ओंकार शिंदे, गणेश शिंदे, अनिकेत गाडे, आप्पा गायकवाड, अमोल तिकोने, बाळासाहेब जमादार, लक्ष्मण शेलार उपस्थित होते.
अधिक वाचा –
– स्तुत्य उपक्रम! तळेगाव दाभाडे येथील एमएसईबी तळ्यात 5 हजार मत्स्यबीजांचे रोपण
– भाजपाकडून अटल दिनदर्शिका 2023 चे प्रकाशन, रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वाटप । Vadgaon Maval