Dainik Maval News : श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी (दि.8 मार्च) रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांकरिता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष तसेच श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मिलिंद शेलार यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली.
अबला नारी सबला झालेली असून महिला सशक्तिकरणास प्रोत्साहन देण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आपल्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापक रावसाहेब सिरसट यांनी सांगितले. महिलांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमास मिलिंद शेलार, संदीप मगर, विलास टकले, रावसाहेब सिरसट, पर्यवेक्षिका रेणू शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
- तंत्रज्ञान कौशल्य विकसित करण्याकरिता डिजिटल सखीच्या माध्यमातून महिलांसाठी तंत्रज्ञानयुक्त व्यासपीठ महिला दिनानिमित्त उपलब्ध करून ‘डिजिटल सखी’ बाबत मार्गदर्शन संदीप मगर यांनी केले. समाज उभारणी, विद्यार्थ्यांची जडणघडण ,भावी पिढीच्या उज्वल भविष्याकरिता महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे वक्तव्य मिलिंद शेलार यांनी केले.
स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या सर्व महिला शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचा गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शिक्षक विजय जाधव यांनी केले. या स्तुत्य उपक्रमाचे श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, उपाध्यक्ष दादासाहेब उर्हे, सहसचिव व शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे, कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे आदींनी कौतुक केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाबाबत नवीन डेडलाईन ; 10 एप्रिलपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Lonavala News
– संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा ; भंडारा डोंगर येथे आजपासून गाथा पारायण व कीर्तन महोत्सव
– रसायनमिश्रीत सांडपाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई ; पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणावर पर्यावरण मंत्र्यांची भूमिका