Dainik Maval News : माळवाडी गावच्या उपसरपंच पदी सचिन तुकाराम शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सरपंच पल्लवी संपत दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड सभेत सचिन शेळके यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली.
ग्रामपंचायतीचे मावळते उपसरपंच विदुर राजाभाऊ पचपिंड यांनी ठरविल्याप्रमाणे पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त पदासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी विहित मुदतेत सचिन शेळके यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी अविरोध निवड जाहीर झाली. ग्राम विस्तार अधिकारी व सर्व ग्राम सदस्य यावेळी उपस्थित होते.
याप्रसंदी गोरखतात्या दाभाडे, बजरंग जाधव, नामदेवराव दाभाडे, बाळासाहेब ना दाभाडे, सिद्धार्थ दाभाडे, बाळासाहेब भोंगाडे, सुरेश शिंदे, अशोक दाभाडे, सुनील भोंगाडे, अर्जुन आल्हाट, रोहिदास मराठे, बाळासाहेब म दाभाडे, विजय जाधव, मनोहर जाधव, विठ्ठल भोंगाडे, बाबाजी मचंरे, सागर जाधव, कुमार आल्हाट समीर जाधव, अनिकेत जाधव गावातील अनेक मान्यवर व महिला उपस्थित होत्या.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पवना कृषक’वर भाजपाची सत्ता ! सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणाला अपयश, सिनेमाला लाजवेल अशा घडामोडी, वाचा सविस्तर
– दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार
– पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates