राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) लढ्यातील काही मागण्यांवर निर्णय घेण्यात दिरंगाईचे धोरण स्विकारल्यानंतर राज्यातील मराठा समाज (Maratha Samaj) आता आक्रमक होताना दिसत आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी निवडणूकीत (Election 2024) मराठा समाजाची ताकद दिसेल अशा आशयाचे वक्तव्य अनेकदा केले होते. त्यानुसार सकल मराठा समाजाने राज्यातील सर्वच लोकसभा ( Loksabha) मतदारसंघात मराठा उमेदवार देण्याबाबत विचारमंथन सुरु केले. यातूनच लोणावळा (Lonavala) येथे झालेल्या सकल मराठा समाज मावळ तालुका (Maval Taluka) यांच्या बैठकीत मावळ लोकसभेसाठी (Maval Lok Sabha) मराठा उमेदवार देण्यावर एकमत झाले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
मावळ लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाकडून उमेदवार देण्याचा निर्णय बुधवारी (दि. 13) मराठा समाजाने घेतला. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात लाेकसभा निवडणूकीत महायुती, महाविकास आघाडी आणि मराठा समाजाचे उमेदवार अशी लढत होण्याची शक्यता सध्या दिसत आहे. तसेच मावळ लोकसभा मतदारसंघात मराठा समाज हा स्वतंत्र उमेदवार देत असल्याने सर्वच पक्षांची गणित बिघडण्याची शक्यता आहे. ( Sakal Maratha Samaj Maval Will Contest Lok Sabha Elections 2024 )
सकल मराठा समाजा मावळ तालुका यांची लाेणावळा जवळ वाकसई येथे ही बैठक झाली. या बैठकीत एकमताने मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक गावातून 2 उमेदवार देण्याची चर्चा बुधवारच्या बैठकीत करण्यात आली. मावळ लोकसभा मतदारसंघात चिंचवड, मावळ, कर्जत मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या मतदानाचा प्रभाव अन्य उमेदवारांवर दिसून येऊ शकतो.
अधिक वाचा –
– महत्वाची अपडेट! तळेगाव दाभाडे शहरातील पाणीपुरवठा आज बंद राहणार । Talegaon Dabhade
– भाजपाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर! पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांना तिकीट; पंकजा मुंडे, मुनगंटीवार यांनाही उमेदवारी
– कामशेतमध्ये शनिवारी ‘सौ-भाग्यवती मावळ’ कार्यक्रम, दुचाकी आणि सोन्यांच्या नाण्यांसह भरघोस बक्षिसे, वाचा सविस्तर