इंदोरी (ता. मावळ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदीप नाटक यांची निवड झाली आहे. ग्रामपंचायतीचे मावळते उपसरपंच स्वप्नील शेवकर यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी विशेष सभा बोलावण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शशिकांत शिंदे होते. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी कैलास कोळी यांनी काम पाहिले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी विहित कालावधीत उपसरपंच पदासाठी संदीप सखाराम नाटक यांचा एकमेव अर्ज दाखल झाला, त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. संदीप नाटक हे भाजपा युवा मोर्चा मावळ तालुका सरचिटणीस म्हणूनही कार्यरत आहेत. संदीप नाटक यांच्या बिनविरोध निवडीनंतर ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच शशिकांत शिंदे, दामोदर शिंदे, जगन्नाथ शेवकर, बाळकृष्ण पानसरे, महेश पानसरे, राहुल ढोरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. ( Sandeep Natak elected as deputy sarpanch of Indori Gram Panchayat maval )
यावेळी सुनील चव्हाण, संदीप काशिद, सुरेखा शेवकर, मुकेश शिंदे यांनी अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले. तसेच बबनराव ढोरे, आण्णासाहेब शिंदे, प्रशांत ढोरे, मनोहर भेगडे, प्रवीण भापकर, निवृत्ती हिंगे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 161 इमारती धोकादायक । Talegaon Dabhade
– वडगावमध्ये पंढरपूरला पायी जाणाऱ्या दिंडीचा सन्मान ; पोटोबा महाराज देवस्थानचा वार्षिक अहवालही प्रकाशित । Vadgaon Maval
– शिवसेवा प्रतिष्ठान लोणावळा यांच्या मार्फत येळसे गावात वृक्षारोपण आणि वृक्ष दत्तक अभियान