मावळ तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. बुधवारी, दिनांक 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस होता. त्यामुळे दुपारपर्यंत वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स इथे मोठी धावपळ पाहायला मिळाली. सायंकाळपर्यंत निवडणूका असलेल्या 29 ग्रामपंचायतींचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झालं होतं. यावेळी मावळ तालुक्यातील महत्वाची ग्रामपंचायत असलेल्या सांगिसे-बुधवडी ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदाच्या 7 पैकी 2 जागा बिनविरोध झाल्या. माजी सरपंच बबन टाकळकर यांच्या पुढाकारातून बुधवडी वॉर्डातील सदस्य पदाच्या 2 जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे आता 7 सदस्यीय ‘सांगिसे-बुधवडी’ ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये 5 सदस्य पदासाठी आणि सरपंच पदासाठी निवडणूक रंगणार आहे. ( Sangise Budhwadi Group Gram Panchayat Election 2023 Maval Taluka )
बुधवडी वॉर्डातील 2 सदस्य बिनविरोध –
सांगिसे बुधवडी हि ग्रुप ग्रामपंचायत असून बुधवडी गावात 2 सदस्य वॉर्ड आहे. यात दोन्ही सदस्य हे बिनविरोध निवडून आलेत. येथील 2 जागांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित जागेवर तुकाराम राजाराम टाकळकर आणि सर्वसाधारण महिला आरक्षित जागेवर सुष्मा गणेश टाकळकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सांगिसे गावातील दोन्ही वॉर्डात रंगणार निवडणूक –
सांगिसे गावातील वॉर्ड क्रमांक 1 मध्ये तीन सदस्य असून येथे एकूण 7 जण रिंगणार आहेत. पैकी सर्वसाधारण महिलांच्या दोन जागांसाठी 5 उमेदवार असून अन्य एका सर्वसाधारण जागेसाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत. तर, सांगिसेतीलच वॉर्ड क्रमांक – 2 मध्ये दोन जागांवर 4 उमेदवार रिंगणार आहेत. तर., सरपंच पदासाठी आरक्षित अनुसुचित जाती महिला जागेसाठी एकूण 3 उमेदवार रिंगणात असून सरपंच पदासाठी गावात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून वडगाव शहरातील विविध विकासकामांना प्रारंभ
– अत्यंत दुःखद बातमी! ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन
– ग्रामपंचायत निवडणूक : छाननीत अर्ज बाद का होतात? ग्रामपंचायत उमेदवारांसाठी अटी आणि पात्रता काय असतात? जाणून घ्या