Dainik Maval News : मावळ तालुक्यातील सांगवी गावचे ग्रामदैवत आणि वडगाव मावळ येथील तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज यांची बहीण म्हणून ओळख असलेल्या श्री जाखमाता देवीची वज्रलेप करून नुकतीच धार्मिक विधीने पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली. इंद्रायणी नदीच्या तीरावर श्री जाखमाता देवीचे पुरातन मंदिर असून या मंदिराचा जीर्णोद्धार आणि सभामंडप कामाचा भूमिपूजन समारंभ काही दिवसांपूर्वी झाला आहे.
आमदार सुनील शेळके यांच्या निधीतून सभामंडपाचे काम सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी देवीची मूळ मूर्तीही नदीपात्रापासून उंचीवर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मूळ मूर्तीची मळी काढून तिच्यावर वज्रलेप करण्यात आला. आगामी पंधरा दिवसांवर असलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वज्रलेप केलेल्या मूर्तीची विधिवत पूजाअर्चा करून सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली.
श्री जाखमाता देवी हे जागृत देवस्थान मानले जात असून, तीर्थक्षेत्र पोटोबा महाराजांची बहीण म्हणून पुरातन काळापासून भाविकांची श्रद्धा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी पोटोबा महाराजांची पालखी जाखमाता मंदिरात येते. येथे पोटोबा महाराजांच्या मुखवट्यांना इंद्रायणी नदीत स्नान घालून पोटोबा महाराज व जाखमाता देवी यांची बहीण-भाऊ भेट ही होते. ही परंपरा अखंडपणे सुरू आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील एक केंद्रप्रमुख व दोन शिक्षकांना जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर । Maval News
– प्रशांत दादा भागवत आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न । Prashant Bhagwat
– व्हिडिओ : ग्रामसभेतच अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न ; मावळमधील कामशेत येथील गंभीर घटना । Kamshet News

 
			






