Dainik Maval News : राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून तळेगाव दाभाडे येथील शांताई रेसिडेन्सी मधील महिलाभगिनींनी स्वच्छता दूत असणारे सफाई कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सोहळा साजरा केला.
महिला मंडळाच्या वतीने स्वच्छता कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. परिसर स्वच्छ, सुंदर व निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
आपल्या आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांचा सन्मान करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, अशी भावना महिलांनी व्यक्त केली. सर्व सफाई कर्मचाऱ्यांना यावेळी भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. काही महिलांनी कर्मचाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे अनुभवही सांगितले.
सफाई कर्मचाऱ्यांनीही मिळालेल्या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला व भविष्यातही निष्ठेने सेवा देण्याचे आश्वासन दिले. या उपक्रमामुळे परिसरात आपुलकी, सामाजिक बांधिलकी व परस्पर सन्मानाची भावना अधिक दृढ झाली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– माझी वसुंधरा अभियान 5.0 : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा विभागस्तरीय प्रथम क्रमांक ; 75 लाख रुपयांचे पारितोषिक
– मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर ; अध्यक्षपदी मुकुंद तनपुरे
– मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नामदेव शेलार यांच्याकडून पदाचा राजीनामा
– सरत्या पंचवार्षिक काळात २५ कोटींची विकासकामे कामशेत ग्रामपंचायतीने केली – सरपंच रुपेश गायकवाड