Maval Lok Sabha Election : चौथ्या टप्प्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे सर्वच आघाड्यांच्या उमेदवारांसाठी प्रमुख नेत्यांच्या सभांचा धुरळा सध्या मावळ लोकसभेत उडताना दिसत आहे. रॅला, सभा, बैठका, पायी यात्रा यांमुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
- गुरुवारी (दि. 9 मे) मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कामशेत (ता. मावळ) येथे जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार संजोग वाघेरे यांच्यासोबत आमदार अण्णा बनसोडे यांच्या कन्येच्या विवाहात घडलेला प्रसंग उलगडून सांगितला.
‘त्या दिवशी मी अण्णा बनसोडे यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो. त्यावेळी श्रीरंग बारणेंच्या विरोधी असणारे उमेदवार संजोग वाघेरे लक्ष देऊन उभे होते. मी स्टेजवर गेलो अन् गड्याने पाय धरले. फोटो काढला अन् दादांनी आशीर्वाद दिला, असा दावा केला. मी एकदा शब्द दिला की, कोणाच्या बापाचं ऐकत नाही. मी मॅच फिक्सिंग करत नाही,’ असं सर्वांसमोर अजित दादांनी स्पष्ट केले. तसेच अशी बनवाबनवी का करता, असा सवालही विरोधकांना विचारला आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजोग वाघेरे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून शिवसेना पक्षाचे श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात आहेत. शिवसेनेच्या दोन्ही गटातील ही कांटे की टक्कर असणार आहे. त्यामुळे अजित पवारांनी महायुतीच्या उमेदवारासाठी अर्थात बारणेंसाठी गुरुवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ( Sanjog Waghere Met Ajit Dada Maval Lok Sabha Ajit Pawar Explain What Actually Happened Kamshet Rally )
यावेळी अजितदादांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काही महत्वाच्या सूचना देखील केल्या. मावळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कुठंही दगाफटका करायचा नाही, असं सांगत असतानाच अजित पवार यांनी मविआ चे उमेदवार संजोग वाघेरे यांचा आतून प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सज्जड दम दिला.
अधिक वाचा –
– अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य ! Pune News
– ट्रक-टेम्पो आणि कार, खोपोलीजवळ 3 वाहनांचा भीषण अपघात; 3 जण ठार, 8 जखमी । Accident On Mumbai Pune Expressway
– वडगाव शहरातील पायी ‘मशाल’ रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद, ‘आता फक्त संजोग वाघेरे पाटील..’ गीताने दणाणला परिसर