Dainik Maval News : संकल्प शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संकल्प इंग्लिश स्कूल पवना नगर येथे गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून आद्य गुरू म्हणुन मातृपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व माता पालकांच्या हस्ते माता सरस्वती आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पूजास्थान पाट,रांगोळी आणि गुलाब पाकळ्यांनी सजविण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपआपल्या मातांचे औक्षण करून पाय धुतले आणि पुष्पगुच्छ देऊन नमस्कार केला. यावेळी शाळेतील वातावरण पूर्ण भक्तिमय झालेले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आई आणि गुरू यावर आधारित गीतांमुळे वातावरण प्रसन्न झाले होते. गुरू आणि माता यांच्यावर आधारित अनेक भित्तीपत्रके विद्यार्थी आणि शिक्षकां मार्फत तयार करण्यात आली होती. यावेळी गुरू पोर्णिमेची पार्श्वभूमी विज्ञान विभाग प्रमुख कल्याणी सावंत, गुरू शिष्य परंपरा क्रीडा विभाग प्रमुख प्रियांका येवले यांनी तर गुरूमहिमा पर्यवेक्षक कैलास येवले यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. माता सर्व वातावरण पाहून भारावून गेल्या होत्या. मनोगत व्यक्त करताना त्यांना आनंदाश्रू रोखता आले नाहीत. ( Sankalp English School celebrated Guru Poornima by performing Matru Pooja Pavananagar )
कार्यक्रमासाठी काले पवनानगर. पोलिस पाटील सीमा यादव,माता पालक प्रतिनिधी अनिता मोहोळ,आरती घारे, वैशाली सोनवणे,आशा सोनवणे ,जयश्री ठाकर, मधु दळवी, प्रतीक्षा करवंदे, आदी माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नीता कालेकर, सोनल गांधी, बाळू कदम, कैलास येवले, प्रियांका येवले, आशा बोरकर, मोना गांधी, वैष्णवी काळे, कल्याणी सावंत आदींनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी समीक्षा लगड ,काव्या ढोरे, समरीन सय्यद, निर्मला अहीर यांनी केले तर आभार समृद्धी भानूसघरे या विद्यार्थिनीने मानले.
आजच्या धावपळीच्या युगात आणि मोबाईल च्या नादात संस्कारांची कमतरता पाहायला मिळत आहे. पण शाळेच्या माध्यामातून असे उपक्रम राबवून निश्चितच संस्कृती आणि संस्कार जपले जात आहेत. – आरती संतोष घारे, पालक
शाळेने राबविलेला उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे समाजात वेगवेगळे गुरू भेटत असताना आपले आई वडील आणि आपले आचार्य यांचे आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. विद्यार्थ्यांकडून हे संस्कारी कृत्य होत असताना खूप आनंद झाला. – सीमा यादव, पालक ( पोलीस पाटील, काले-पवना नगर)
आज संकल्प इंग्लिश स्कूल मध्ये गुरू पौर्णिमेनिमित्त मातृपूजन घेण्यात आले खूप आनंद वाटला. आमच्या मुलांवर चांगले संस्कार या मार्फत होत आहे याचा आम्हाला आनंद वाटतो. – वैशाली भाऊ सोनवणे ,पालक
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात ७० टक्के भात लागवडी पूर्ण, पवन मावळ विभागात सर्वाधिक लावणी
– येळसे गावात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ‘पीक विमा पाठशाळा’ संपन्न, विमा कंपनी आणि कृषी विभागाकडून मार्गदर्शन
– मोठी बातमी : कासारसाई-कुसगाव धरणात बुडून 17 वर्षीय कॉलेज कुमारचा मृत्यू । Pune News