संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांजाचे सेवन करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. मादक पदार्थ विरोधी कारवाईसाठी पोलीस ठाण्याकडून नेमलेल्या विशेष पथकाकडून कारवाई करत गांजाचे सेवन करणाऱ्या 11 लोकांविरुध्द एन.डी.पी.एस. कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्यांना वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्यांना दंडाची शिक्षा सुनावली आणि व दंड न भरल्यास 15 दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. ( Sankalp Nashamukti Lonavala Rural Police Action Against 11 Drug Addicts )
यापुर्वी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अशाप्रकारच्या 4 केसेस करण्यात आल्या आहेत. गांजाची वाहतूक आणि अवैध विक्रीबाबत धडक कारवाई करीत 20 किलो गांजा व वाहतूक करणारी दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. यापुढेही गांजा वाहतूक व विक्री करण्याऱ्या तसेच गांजा सेवन करणाऱ्या लोकांची माहिती मिळवून अशाप्रकारे विशेष पथके नेमून कारवाई करणार असल्याबाबत पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी माहिती दिली.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते, सहा. पोलीस निरीक्षक देविदास करंडे, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस निरीक्षक सागर अरगडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युवराज बनसोडे, पोलिस हवालदार जय पवार, पोलीस अंमलदार गणेश होळकर, केतन तळपे, राहुल खैरे, संजय पंडीत, सतीश कुदळे, अमोल गवारे, पोलीस मित्र अमित भदोरीया यांनी सदरची कारवाई केली आहे. ( Sankalp Nashamukti Lonavala Rural Police Action Against 11 Drug Addicts )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– श्रावणातील नाग-नरसोबाचा कागद म्हणजे प्राचीन मातृका पुजनाचे आधुनिक रुप – दैनिक मावळ श्रावण विशेष लेख
– चंद्रयानच्या चंद्रावरील यशस्वी लँडिंगसाठी श्रीमंत दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक । India Chandrayaan 3
– जय मल्हार ऑटो रिक्षा संघटनेचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते उद्घाटन । Vadgaon Maval