Dainik Maval News : मावळ तालुक्यात सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मावळात जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या दहा जागा आहेत, या सर्वच ठिकाणी आता प्रचाराची धामधूम सुरू आहे. रविवारी (दि. २५ जानेवारी) मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाचही गटांपैकी सर्वाधिक चर्चेत असलेल्या कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.
आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रमेश साळवे यांसह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. कुसगांव बुद्रुक जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संतोष गबळू राऊत हे जिल्हा परिषदेचे, तर योगेश मुरलीधर लोहर हे कुसगांव बुद्रुक पंचायत समिती गण आणि शैलाताई रामचंद्र कालेकर या काले गणाचे अधिकृत उमेदवार आहेत.
कुसगाव बुद्रुक येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा आरंभ आणि विजयाचा संकल्प राष्ट्रवादी कडून करण्यात आला. याप्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते , पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना आमदार सुनील शेळके यांनी संतोष राऊत हे मावळ तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणारे जिल्हा परिषदेचे उमेदवार ठरतील , असा विश्वास व्यक्त केला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– कार्ला-खडकाळा गटाच्या विकासासाठी आशाताई वायकर यांचे गणरायाला साकडे !
– राष्ट्रवादीने इंदुरी-वराळे गटात फोडला प्रचाराचा नारळ ! नवलाख उंबरे गावात प्रचार रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
– ‘…त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलंच नाही’ ; मावळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आमने – सामने
– निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळात पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर ; जागोजागी होतेय वाहनांची तपासणी