व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या सरदार चिमणाजी देशपांडे यांच्या वडगावमधील समाधीची दुरावस्था, शिवभक्तांची ‘ही’ मागणी

मोगलांविरोधातील लढाईत वीरगती प्राप्त झालेल्या पुण्यातील चिमणाजी बाळाजी देशपांडे (नरेकर) यांची छत्रपती शिवाजी महाराजांनी वडगाव येथे बांधलेली समाधी आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 23, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, लोकल, शहर
vadgaon-maval

Photo Courtesy : Vijay Surana


वडगाव मावळ येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या चिमाजी देशपांडे यांच्या समाधीची दुरावस्था झाली असून दगडांची पडझड सुरू झाली आहे. अतिक्रमणामुळे येथील रस्ता देखील बंद झाला आहे. या समाधीची दुरूस्ती करावी, अशी मागणी शिववंदन ग्रुपच्या सभासदांनी केली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मोगलांविरोधातील लढाईत वीरगती प्राप्त झालेल्या पुण्यातील चिमणाजी बाळाजी देशपांडे (नरेकर) यांची छत्रपती शिवाजी महाराजांनी वडगाव येथे बांधलेली समाधी आहे. सुरत वरून परतत असताना मोगलांनी त्यांना गाठून मारण्याचा प्रयत्न केला. महाराजांसोबत सैन्य घोडे होते. पण लुटीची संपत्ती घोड्यांवर लादली असल्याने युध्द करणे शक्य नव्हते. त्यामुळे महाराजांनी चिमणाजी देशपांडे यांना पुण्यातून दोन हजार सैन्य घेऊन मोगलांना रोखण्यास सांगितले. त्यावेळी तळेगाव, वडगाव या भागात तीन दिवस तुंबळ लढाई झाली. ( sardar chimnaji deshpande mausoleum in vadgaon maval has fallen into disrepair )

त्यात चिमणाजींना वीरमरण आले. राजगडावर पोहचल्यानंतर महाराजांना हे वृत्त समजल्यानंतर त्यांनी 4 फेब्रुवारी 1664 रोजी वडगाव मावळ येथे येऊन चिमणाजींची समाधी बांधली, या समाधी स्थळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेसह अनेकांनी या ठिकाणी भेट दिली आहे. पुण्यातील चिमणाजींचे वंशज देशपांडे कुटूंबीयांनी देखील सात ते आठ वर्षांपूर्वी या समाधीला भेट दिली होती. जिल्हातून अनेकजन या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.

रस्ता बंद….समाधीची पडझड

हा रस्ता पूर्वी पासून होता. परंतू एका खाजगी मालकाने कंपाऊट केल्याने तो फक्त तीन फुटाच्या राहिला आहे. त्यामुळे या समाधीची पुजा अर्चा, अभिषेक करण्यासाठी देखील मोठी कसरत होत आहे. सदरचा रस्ता खुला करून या समाधीची दुरूस्ती करावी अशी मागणी शिववंदन ग्रुपचे तुषार वहिले, दिनेश ठोंबरे, मंगेश वाघमारे, संतोष देशमुख यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी व पुरातत्व विभागाकडे केली आहे.

अधिक वाचा –
– मावळ तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी सोमनाथ कालेकर तर उपाध्यक्षपदी विठ्ठल पाठारे; पाहा संपूर्ण कार्यकारिणी
– क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या स्मारकासाठी राज्य शासन 41 कोटी देणार; स्मारकाच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदी येणार । Pimpri Chinchwad


dainik maval jahirat

Previous Post

साते ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गणेश बोऱ्हाडे यांची बिनविरोध निवड

Next Post

मावळातील पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे पूर्ण करा, प्रशासनाला निर्देश

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-panchayat-samiti

मावळातील पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे पूर्ण करा, प्रशासनाला निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.