वडगाव शहरातील मानाची दहीहंडी असलेल्या श्रीमंत सरदार महादजी शिंदे ऑटो व टॅम्पो संघटनेच्या वतीने आयोजित केलेला दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यंदा महादजी शिंदे रिक्षा संघटना नदहिहंडी उत्सावाचे हे 34 वे वर्ष होते. यावर्षीचा दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात आणि आनंदात साजरा होत असल्याने तरुणाईचा उत्साह द्विगुणित झाला होता.
सरदार महादजी शिंदे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांच्या शुभहस्ते हंडीचे पुजन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर भोसले, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, रा. का. वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, माजी स्विकृत नगरसेवक सुनिल ढोरे, उद्योजक युवराज ढोरे, संघटनेचे अध्यक्ष सुभाष नवघणे, उपाध्यक्ष भाई सुतार, दत्तात्रय देशमुख, काळू तुमकर, ओंकार तुमकर, जितेंद्र तांबोळी, जयदीप दाभाडे आणि ऑटो व टेम्पो संघटनेचे सदस्य, गोपाळ भक्त आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबईतील मानखुर्द येथील शिवनेरी प्रतिष्ठान गोविंद पथकाने शहरातील मानाची दहीहंडी फोडण्याचा मान पटकावत आनंदोत्सव साजरा केला. मान्यवरांच्या उपस्थितीत या गोविंद पथकांना रोख 1 लाख 51 हजार पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. ( Sardar Mahadji Shinde Auto and Tampo Association Dahi Handi 2023 of Vadgaon Maval City )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘गोविंदा रे गोपाळा…’ मावळ तालुक्यात शाळांमध्ये दहीहंडीचा उत्साह
– चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना सुखद धक्का
– सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवर कर्ज ते सायबर सुरक्षेसाठी 837 कोटींचा प्रकल्प; वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय