क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अर्थात बालिका दिन संकल्प इंग्लिश स्कूल पवनानगर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणुन संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव लक्ष्मण भालेराव, उपाध्यक्ष पोपटशेठ कालेकर, संचालक डॉ. संजय चौधरी, संचालिका विद्या गांधी, सुधीर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. ( savitribai phule jayanti celebrated with great enthusiasm at Sankalp English School Pavanagar )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांनी पाहुण्यांना प्रभावित केले. विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची भाषणे देखील झाली. यावेळी विद्यार्थ्यां साठी वेषभूषा स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी, पंडिता रमाबाई, डॉ. आनंदीबाई गोपाळ, मदर तेरेसा , इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील, कल्पना चावला ,किरण बेदी, वकील, शिक्षिका, उद्योजक असे विविध रोल सादर केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राहुल सोनवणे याच्या मार्गदर्शनाखाली नीता कालेकर, सोनल गांधी, बाळू कदम, कैलास येवले, मीनाक्षी शिवणेकर ,प्रियांका येवले, वैष्णवी काळे, आशा बोरकर, सुजाता वाघेरे, निकिता कालेकर आदींनी विशेष प्रयत्न केले.
अधिक वाचा –
– तीर्थक्षेत्र देहूत विकास कामांचा धडाका; खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते भूमीपूजन, लोकार्पण
– लोणावळा शहराजवळ मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, तळेगावमधील युवक जागीच ठार । Accident Braking