तळेगाव-दाभाडे : मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय तळेगाव-दाभाडेला नॅक कडून ‘बी’ ग्रेड मानाकंन प्राप्त झाले आहे. दिनांक 3 आणि 4 ऑक्टोबर 2023 रोजी नॅक बंगळूर कडून डॉ. मनिमेकलाई कालीधासन (तमिळनाडू), डॉ. मुफ्फीद अहमद (जम्मू काश्मीर) आणि डॉ. अनुप कुमार (पंजाब) या त्रिसदस्यीय समितीकडून महाविद्यालयाची सर्व प्रकारची पाहणी करण्यात आली होती. ( Savitribai Phule Mahila College Talegaon Dabhade received B grade recognition from NAAC )
दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी नॅक कडून महाविद्यालयाला ‘बी’ (B) ग्रेड मानांकन प्राप्त झाल्याचे जाहीर करण्यात आले. मावळ तालुक्यातील मुलींसाठी असणारे हे एकमेव महाविद्यालय ( Savitribai Phule Mahila College Talegaon Dabhade ) आहे. या सर्व प्रक्रियेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीहरी मिसाळ, नॅक समन्वयक प्रा. सोमनाथ कसबे, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.
ह्या यशाबद्दल मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार सुनिल शेळके, सचिव यादवेंद्र खळदे , खजिनदार नंदकुमार शेलार, सहसचिव प्रा. वसंत पवार तसेच सर्व संचालक आणि पदाधिकारी यांनी सर्वांचे अभिनंदन केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत लोकलच्या फेऱ्या वाढवा; खासदार बारणेंचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
– मोठी बातमी! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कार्ला फाटा ते वेहेरगाव दरम्यान 10 दिवस अवजड वाहनांना प्रवेश बंद, वाचा संपूर्ण आदेश
– शिरगाव पोलिसांकडून पवना नदी काठचा दारूअड्डा उध्वस्त; पोलिसांना पाहताच संशयिताने ठोकली धूम