Dainik Maval News : राज्यात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. विधानसभा निवडणूकीत कोणताही गैरप्रकार घडू नये, तसेच पैशांचा होणारा गैरवापर यावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार राज्यात कडक बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. मावळ तालुक्यात देखील ठिकठिकाणी चेक पोस्ट तयार करुन पोलीस प्रशासन काम करीत आहे.
राज्यात विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा काम करीत आहे. पोलीस प्रशासनाकडूनही जागोजागी बंदोबस्त तैनात केला आहे. निवडणूकीत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी चेक पोस्ट नाक्यावर वाहनांची तपासणी केली जात आहे.
सोमाटणे फाटा येथील टोलनाक्या जवळ पोलिसांचे मोठे पथक तैनात असून त्या पथकाद्वारे येणाऱ्या जाणाऱ्या संशयीत वाहनांची तपासणी केली जात आहे. तसेच वाहनांतील व्यक्तींसह जर बेहिशोबी रक्कम आढळून येत असेल, तर ती जप्त करून कारवाई केली जात आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘महायुतीचा उमेदवार असताना अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणे म्हणजे राजकीय आत्महत्या’
– आमदार सुनिल शेळके यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल, रात्री दहानंतर प्रचार फेरी काढल्याने गुन्हा । Mla Sunil Shelke
– बापूसाहेब भेगडे यांच्या गाव भेटीत तरुण कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक व महिलांचा मोठा प्रतिसाद । Bapu Bhegade