Dainik Maval News : विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या विविध तपासण्या करण्यासाठी मावळ मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांत निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्ष सुरू केले आहेत. तपासणी खर्चाचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. त्यानुसार उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाचा तपशील सादर करून तपासणी करून घ्यावा, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.
मावळ विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय वडगाव मावळ येते असून संबंधित कार्यालयांमध्येच त्या-त्या मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्ष सुरू केले आहेत. तीन टप्प्यात खर्चाची तपासणी होणार आहे. यामध्ये उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंतच्या खर्चाचे सनियंत्रण करण्यात येणार आहे.
उमेदवारांच्या खर्चाच्या तीनही तपासण्या निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे करण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे उमेदवारांनी सादर केलेला खर्च तपासला जाणार आहे. तपासणीसाठी विहित वेळेत खर्चाचा तपशील सादर करावा, तसेच निवडणूक कामकाजाकरिता उमेदवाराने दररोज केलेल्या खर्चाचा तपशील, बैंक पासबुक व सर्व देयकांच्या मूळ पावत्यांसह खर्च सादर करावा, अशा सूचना संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
महाराष्ट्र विधानसभा२०२४, उमेदवारांना सूचना
– निवडणूक खर्च तपासणी दिनांकाच्या दिवशी उमेदवार अथवा त्यांच्या अधिकृत खर्च प्रॉक्सी खर्च व्यवस्थापन कक्षात उपस्थित राहावे
– निवडणूक खर्च तपासणीच्या वेळी दैनंदिन खर्चाची नोंदवही अद्ययावत नोंदवून तपासणीसाठी सादर करावी
– निवडणूक खर्चाच्या आनुषंगिक सर्व कागदपत्रे तपासणीच्या वेळी सोबत आणावीत.तिथे उमेदवारांनी दैनदिन खर्चाचा तपशील सादर करावा त्यासाठी तपासणी खर्चाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
– उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी 9नोव्हेंबर, दुसरी तपासणी १३ नोव्हेंबर आणि तिसरी तपासणी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १२.३० वाजता निवडणूक खर्च निरीक्षक प्रेम प्रकाश मीना यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली आहे.
– निवडणूक खर्च तपासणी दिनांकाच्या दिवशी अनुपस्थित राहिल्यास अथवा खर्चामध्ये तफावत असल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाईल.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– लोणावळा ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी ! अवघ्या तीस तासात खुनातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या । Maval Crime
– मोठी बातमी ! पवनमावळातील विसापूर किल्ल्यावर सापडले शिवकालीन तोफगोळे । Maval News
– वडगाव मावळ शहरात पोलिसांचा सशस्त्र रुट मार्च । Vadgaon Maval