महिला आर्थिक सक्षमीकरण आणि ग्राम उद्धार कार्यक्रमांतर्गत शिळींब गावातील महिलांना शेवई बनवण्याचे यंत्र वाटप करण्यात आले. सीड ट्रस्ट आणि हॅन्ड इन हॅन्ड इंडिया तळेगाव दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम उद्धार कार्यक्रम अंतर्गत शिळींब गावातील महिलाांना या मशीनचे वाटप करण्यात आले. महिलांना उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. ( Sevai making machines were distributed to the women of Shilimb village )
शिळिंब (ता. मावळ) या ठिकाणी शेवया बनवण्याचे मशीन देण्यात आले. गुरुवारी या मशीनचे उद्घाटन करण्यात आले. याचे उद्घाटन हॅन्ड इन हॅन्ड इंडिया चे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट बैरवमूर्थी सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हॅन्ड इन हॅन्ड इंडियाचे अनिल पिसाळ, ओंकार कुलकर्णी, अभिजित अब्दूले, सारिका शिंदे व सखी बचत गटातील महिला उपस्थित होत्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– बैलपोळा सणाच्या दिवशीच बैलाचा मृत्यू; सावळा येथील शेतकऱ्यावर कोसळला दुःखाचा डोंगर
– आदिवासी कुटुंबीयांसाठी सेवा अभियान; आमदार सुनिल शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त मोरया प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम । Vadgaon Maval
– इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या सहकार्याने सोमाटणेतील जिल्हा परिषद शाळा बनली ‘हॅप्पी स्कूल’