Dainik Maval News : लोणावळा परिसरात फिरायला आलेल्या एका सतरा वर्षीय युवकाचा वलवण धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. निलेश शिंदे (वय 17, रा. कासारवाडी, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार, निलेश हा त्याच्या मित्रांसह लोणावळ्यात फिरायला आला होता. वरसोली परिसरातून ते वलवण धरणाच्या बाजूला गेले. तिथे पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या निलेशला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. ही घटना घडताच स्थानिकांनी तातडीने शिवदुर्ग मित्र लोणावळा रेस्क्यू टीमला माहिती देण्यात आली.
सूचना मिळताच रेस्क्यू टीम त्वरित साहित्यासह घटनास्थळी दाखल झाली. पाणबुडीच्या साहाय्याने त्यांनी निलेशचा मृतदेह शोधून बाहेर काढला. वैभव दुर्गे, योगेश दळवी, मयूर दळवी, सागर दळवी, कपिल दळवी, आकाश मोरे, रोहित मोरे, महेश मसने, कुणाल कडु, महादेव भवर, पिंटू मानकर, सतीश सागर आणि सुनील गायकवाड यांनी शोधकार्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जून महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– जिल्हाधिकाऱ्यांकडून मावळच्या सर्वांगीण विकासाला गती ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक
– पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील 15 ‘ब्लॅक स्पॉट’ची दुरुस्ती । Pune Mumbai Highway
