पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी (दि. 5 जानेवारी) दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत 8 तासात सर्व आरोपींना जेरबंद केले. अगदी फिल्मी स्टाईलने पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. दरम्यान आज (शनिवार, दि. 6 जानेवारी) पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत ह्या संपूर्ण कारवाईचा थरार सांगितला. यातच शरद मोहोळ याच्या हत्येमागचं खरं कारण समोर आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मामाच्या अपमानाचा भाच्याने बदला घेतला –
शरद मोहोळ याच्यावर तीन आरोपींनी गोळ्या झाडल्या. मुख्य आरोपी साहील उर्फ मुन्ना पोळेकर आणि इतर दोन जणांनी रस्त्यावर गोळीबार केला. मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ याच्याबरोबर फिरायचा. आरोपी साहिल याचा मामा नामदेव महिपती कानगुडे दुसरा एक नातेवाईक विठ्ठल किसन गांडले. या दोघांचे शरद मोहोळसोबत वैमनास्य होते. यामुळे प्रकरणात हल्ला झाल्याचे प्राथमिक माहिती पोलिसांना दिली आहे.
दोन गाड्यांमध्ये दोन वकील होते. त्यांचा सहभाग काय होता. हे तपासात समोर येणार आहे. मुन्ना पोळेकर सुतारदरा परिसरात राहतो. गेल्या 20 ते 25 दिवसांपासून तो शरद मोहोळ याच्या कार्यालयात जात होता. पोलिसांनी या प्रकरणात कोथरुड पोलीस स्टेशन येथे गुरजि.नं. 2/2023 भा. द. वि. कलम 302, 307, 34 आर्म अॅक्ट कलम 3/7 (25), महा पोलीस अधिनियमचे कलम 37(1) सह 135 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
जमीनीचे होते वाद –
नामदेव महिपती कानगुडे आणि मारुती विठ्ठल गांदले या दोघांचे शरद मोहोळ याच्यासोबत वाद होते. नामदेव कानगुडे हा मुख्य आरोपी पोळेकर याचा मामा असल्याचे समोर आले आहे. या जुन्या वादामुळेच हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आरोपींकडून मिळाली आहे. खुनात एकूण 8 आरोपी सामील असून त्यातील दोन वकील असल्याचेही समोर आले आहे. या वकिलांचा गुन्ह्यांमध्ये नेमका रोल काय? याचा तपास आम्ही सुरू करत आहोत असे पोलिसांनी सांगितले. ( Sharad Mohol Murder Case Cause of Murder Is Clear Accused Sahil Polekar Killed Mohol For Mama )
अधिक वाचा –
– वेहेरगाव-दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा मावकर बिनविरोध । Gram Panchayat Election
– वडगांव शहरातील 300 नागरिकांनी घेतला विकसित भारत संकल्प यात्रेत सहभाग । Viksit Bharat Sankalp Yatra
– अवघ्या 7 दिवसात संजोग वाघेरेंनी जिंकला उद्धव ठाकरेंचा विश्वास! पक्षाकडून मावळ लोकसभेची मोठी जबाबदारी । Maval Lok Sabha