राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे आज (मंगळवार, दिनांक 2 मे) प्रकाशन झाले. मुंबईत वाय.बी. चव्हाण सेंटरला हा सोहळा पार पडला. मात्र यावेळी शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केल्याने एकच गोंधळ उडाला. ( Sharad Pawar Announces Resignation As NCP Chief Ajit Pawar Stopped Supriya Sule From Speaking )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शरद पवारांच्या निर्णयानंतर उपस्थित कार्यकर्ते आणि नेते मंडळींना अश्रू अनावर झाले. सगळ्यांनी घोषणाबाजी सुरु केली आणि निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केली. पक्षातील प्रमुख नेत्यांनी शरद पवार यांना निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केली. अजित पवार यांनी मात्र शरद पवार यांच्या निर्णयाला जवळपास पाठींबा दर्शवला.
तसेच “आज ना उद्या हे होणारच होते, पवार साहेबांच्या डोळ्यांसमोर नवा अध्यक्ष तयार होईल,” असे सांगत अजितदादांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी अजित पवारांचे बोलून झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांना बोलण्याची विनंती केली. तेव्हा सुप्रिया सुळे देखील समोर बसून सर्व पाहत होत्या. मात्र, त्यावेळी अजित पवार यांनी, “सुप्रिया तू बोलू नकोस, मोठा भाऊ म्हणून अधिकारवाणीने सांगतोय, असे सांगत सुप्रिया सुळेंना बोलण्यास मनाई केली. ( ajit pawar stopped supriya sule from speaking )
अधिक वाचा –
– शेवटी अजितदादांनीच बोलता बोलता सांगितलं, “हे आधीच ठरलं होतं” । Sharad Pawar Retirement Announcement
– शरद पवारांची निवृत्तीची घोषणा अन् जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना अश्रू अनावर!