राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे सुधारित आवृत्तीचे आज (मंगळवार, दिनांक 2 मे) प्रकाशन पार पडले. मात्र यावेळी शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. तसेच राज्यसभेची ही टर्म संपली की आपण या पुढे निवडणूक लढणार नाही, अशीही घोषणा त्यांनी केली. या घोषणेनंतर एकच गोंधळ उडाला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शरद पवार यांच्या घोषणेनंतर सभागृहात कार्यकर्ते आणि नेते यांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर सर्वांनीच शरद पवार यांना विनवायला सुरुवात केली. शरद पवार यांनी तहहयात अध्यक्ष रहावे, अशी मागणी करु लागले. निर्णय मागे घ्यावा अशी घोषणाबाजी सभागृहात होऊ लागली. राष्ट्रवादीच्या सर्वच नेते पदाधिकारी यांनी शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावी, अशी मागणी केली. मात्र अजित दादांनी बोलताना हा निर्णय कधीनाकधी होणारच होता, हे सांगताना काळानुरुप काही निर्णय घ्यावे लागतात असे सांगितले. तसेच “हा निर्णय 1 मे ला जाहीर होणार होता, मात्र काल वज्रमुठ सभा असल्याने हा निर्णय आज जाहीर केल्याचे सांगितले.” याचा अर्थ हे होणार होते, हे जवळपास निश्चित होते का? अशी चर्चा होत आहे. ( Sharad Pawar Announces Resignation As NCP Chief Ajit Pawar Support Decision )
अधिक वाचा –
– शरद पवारांची निवृत्तीची घोषणा अन् जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना अश्रू अनावर!
– Breaking : “मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाय”, शरद पवार यांची मोठी घोषणा