व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावमध्ये ‘शासन आपल्या दारी, जत्रा शासकीय योजनांची’ उपक्रम, तब्बल 1 हजार 83 नागरिकांनी घेतला लाभ

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून ‘शासन आपल्या दारी, जत्रा शासकीय योजनांची’ या वडगाव येथे घेतलेल्या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 7, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
shasan-aplya-dari

Photo Courtesy : Twitter / Shrirang Barne


मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून ‘शासन आपल्या दारी, जत्रा शासकीय योजनांची’ या वडगाव येथे घेतलेल्या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. एकूण 1 हजार 83 नागरिकांनी एकाच छताखाली कोणतेही शुल्क न देता विविधता दाखले, लाभ मिळविले. शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले, बचतगटांना अनुदान, गर्भवतींना माता किटचे वाटप करण्यात आले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

खासदार बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव मावळ येथील भेगडे लॅानमध्ये सोमवारी (दिनांक 5 जून) शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेतला. कार्यक्रमास प्रांताधिकारी सुभाष बागडे, तहसिलदार विक्रम देशमुख ,कृषी आधिकारी दत्ता पडवळ, गटविकास अधिकारी सुधिर भागवत, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, भाजपचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेश खांडभोर, शांताराम कदम, मुरलिधर मोहोळ, सुनिल हगवणे, सुनिल मोरे, धनंजय नवघणे यांच्यासह नागरिक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( shasan aplya dari programm at vadgaon maval )

केंद्र सरकार, राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता नागरिकांना विविध दाखल्यांची आवश्यकता असते. यासाठी नागरी सुविधा केंद्र आणि अन्य शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागतात. दाखल्याअभावी नागरिक योजनांच्या लाभापासून वंचीत राहतात. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदार संघनिहाय ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यास सुरूवात केली आहे.

मावळमधील नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा थेट लाभ मिळावा, यासाठी 'शासन आपल्या दारी' उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मावळमधील १ हजार ८३ नागरिकांना योजनांचा आणि इतर सोयी-सुविधांचा लाभ मिळवून दिला. नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.… pic.twitter.com/ruoL0kEBqa

— Shrirang Appa Barne (@MPShrirangBarne) June 6, 2023

त्यानुसार खासदार बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव येथे हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत नागरिकांना तत्काळ दाखले देण्यात आले. एकाच ठिकाणी विविध दाखले मोफत मिळाले. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, अवजारे वाटप करण्यात आले, बचतगटांना अनुदान, गर्भवतींना माता किटचे, पोषण आहार, पाठयपुस्तके, राज्यस्तरीय पीक स्पर्धेतील उत्कृष्ट, विजेत्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देण्यात आला.

नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठीचे दाखले मिळविण्याकरिता सरकारी कार्यालयात खेटा माराव्या लागतात. लोकांना शासनाच्या दारी जायला लागू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शासनालाच लोकांच्या दारी घेवून जात आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांना विनामोबदला दाखले एकाच छताखाली मिळत आहेत. शासकीय योजनांचा लाभ घेणे सोपे होत आहे. निराधार महिलांना लाभ मिळत आहे. याचा मनस्वी आनंद होत आहे. हा उपक्रम यापुढेही राबविला जाईल. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित लोकांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचा मोठा कार्यक्रम घेतला जाणार आहे.
– श्रीरंग बारणे, खासदार मावळ

हेही वाचा – मावळ बाजार समितीच्या प्रास्ताविक कामासंदर्भात सभापती संभाजी शिंदेंचे अजित पवारांना निवेदन

‘शासन आपल्या दारी, जत्रा शासकीय योजनांची’ या उपक्रमांतर्गत 1 हजार 83 नागरिकांना विविध योजनांचा लाभ, दाखले देण्यात आले. विविध विभागांचे 16 स्टॉल लावले होते. नागरिकांकडून विविध योजनांसाठीचे अर्ज भरून घेण्यात आले. पूर्वी ज्यांनी अर्ज केले होते, त्यांना लाभ देण्यात आला. दाखल्याचे वाटप करण्यात आले.
– विक्रम देशमुख, तहसीलदार मावळ

अधिक वाचा –
– ‘मार्केट यार्डपासून मुळशी तालुक्यात धावणाऱ्या पीएमपीएमएलच्या सर्व गाड्या पूर्ववत सुरू करा’ – खासदार सुप्रिया सुळे
– मोबाईल चोरी करणारे 3 सराईत गजाआड, 13 मोबाईलसह लाखोचा मुद्देमाल जप्त, तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई


dainik maval jahirat

Previous Post

इंदोरी ग्रामस्थांचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी, गावातच होणार सुसज्ज तलाठी कार्यालय, इमारतीचे भूमिपूजन संपन्न

Next Post

दारूंब्रे सोसायटी चेअरमनपदी यादव सोरटे आणि वाऊंड सोसायटी चेअरमनपदी बाळासाहेब मोकाशी यांची निवड

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
chairman-maval-taluka-society-election

दारूंब्रे सोसायटी चेअरमनपदी यादव सोरटे आणि वाऊंड सोसायटी चेअरमनपदी बाळासाहेब मोकाशी यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.