घराचा पत्रा उचकटून घरातून मोबाईल चोरी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, तसेच त्यांच्याकडून 13 मोबाईल देखील जप्त करण्यात आले आहेत. प्रज्वल बाळासाहेब मोढवे (वय 20 रा. मिंडेवाडी, मावळ), महेश दत्तात्रेय मंगळवेढेकर (वय 20 रा. आंबेगाव) गौरव सुरजभान गौतम (वय 20 रा. मिंडेवाडी, मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ( talegaon MIDC police arrested 3 criminals who stole mobile phones )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काही दिवसांपूर्वी नवलाख उंब्रे येथील एका पत्र्याच्या खोलीतून पत्रा उचकटून दोन मोबाईल चोरीला गेले होते. याचा तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा व तांत्रिक विश्लेषणानुसार आरोपी हे मंचर येथे असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना दुचाकीसह अटक केले. पोलिस तपासात आरोपींवरील तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील घरफोडी व वाकड पोलीस ठाण्यातील दुचाकी चोरी असे दोन गुन्हे उघडकीस आले. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण 13 मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 1 लाख 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत सांवत, पोलीस उपनिरीक्षक पंडित अहिरे, अनिल भोसले, सहायक पोलीस फौजदार बाळासाहेब जगदाळे, सिताराम पुणेकर, पोलीस नाईक ज्ञानेश्वर सातकर, पोलीस कॉन्स्टेबल स्वराज साठे, कोळेकर, सागर पंडित, रोशन पगारे, पवार, बनसोडे, होमगार्ड दाभणे यांनी ही कारवाई केली.
अधिक वाचा –
– घोरावडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेच्या धडकेने अनोळखी तरूणाचा मृत्यू
– मावळ तालुका वारकरी मंडळाच्या अध्यक्षपदी वरघडे, निकम तर उपाध्यक्षपदी आंभोरे, घारे । Maval News