आखिल भारतीय वारकरी मंडळ मावळ तालुका आणि श्री क्षेत्र पोटोबा देवस्थान संस्थान वडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पोटोबा महाराज मैदान येथे पंढरपूर वारीसाठी प्रस्थान होणाऱ्या दिंड्या, विणेकरी तसेच माता-भगिनींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी मनसेच्या वडगाव नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षा सायली रुपेश म्हाळसकर यांच्या वतीने दिंडीत तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन हरी नामाचा गजर करत-करत पायी चालणाऱ्या महिला-भगिनींचा साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला. ( MNS honors women who march on wari 2023 vadgaon maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी या सन्मानाचे वाटप मनसे महीला आघाडी मावळ तालुका अध्यक्षा ज्योती पिंजन, मनसे महीला आघाडी वडगाव शहर अध्यक्षा अर्चना ढोरे, उपाध्यक्षा सुषमा म्हाळसकर तसेच उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी मावळ लोकसभा क्षेत्राचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे, मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर व विश्वस्त मंडळी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– वडगावातील श्री पोटोबा महाराज देवस्थानच्या पारदर्शक कार्याचा आदर्श वारकरी संप्रदायाने घ्यावा – खासदार बारणे
– किन्हई गावात राष्ट्रवादीकडून ‘एक तास पक्षासाठी’ कार्यक्रम; कार्यकर्त्यांकडून आमदार शेळकेंसाठी मरीमाता मंदिरात यज्ञ