राज्यात गावोगावी सध्या ग्रामदैवतांचे वार्षिक उत्सव साजरे होत आहेत. गावोगावच्या जत्रा, यात्रा, उरुस पारंपारिक पद्धतीने आणि जल्लोषात साजरे होताना दिसत आहेत. मावळ तालुक्यातही प्रत्येक गावात ग्रामदैवताचा वार्षिक उत्सव साजरा होत असतो. गावानुसार या उत्सवला जत्रा, यात्रा आणि उरुसाचे स्वरुप असते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पवन मावळ भागातील मौजे शिळींब गावातील ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांचा वार्षिक उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होतो. मात्र यंदा शिळींब ग्रामस्थांची मंदिर उभारणीचा संकल्प केला असून त्यासाठी सर्व करमणूकीचे कार्यक्रम रद्द करुन भैरवनाथांचा वार्षिक उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला आहे. ( Shilimb Village Deity Bhairavanath Maharaj annual festival )
शिळींब ग्रामस्थांच्या या विचाराचे आणि निर्णयाचे सध्या पंचक्रोशीत कौतूक होत आहे.
चैत्र कृष्ण अष्ठमी अर्थात कालाष्ठमीला मौजे शिळींब गावचे ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ महाराज यांचा वार्षिक उत्सव असतो. दरवर्षी या उत्सवाला विविध कार्यक्रमांचे नियोजन ग्रामस्थांकडून करण्यात येते. यात करमणूकीचे कार्यक्रम, कुस्त्यांचा आखाडा, ढोल-लेझीम मिरवणूक आदी बाबी असतात. मात्र, यंदा ग्रामस्थांनी श्री कालभैरवनाथ मंदिर उभारणीचे काम हाती घेतले असून त्यासाठीच हा सर्व खर्च टाळून साधेपणाने उरुस साजरा केला. मात्र तरीही देवाच्या पालखीला संपूर्ण गाव एकत्र आल्याने उत्सव साधेपणाने होत असला तरीही उत्साह मात्र तितकाच दिसून आला.
अधिक वाचा –
– लाखो श्रीसदस्यांच्या उपस्थितीत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना अमित शहा यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान
– ‘जिल्हा आदिवासी उपयोजना 2022-23 अंतर्गत मावळ तालुक्यातील 75 लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता’ – सुनिल शेळके