Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे यांना मावळ तालुका गटशिक्षणाधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे.
श्रीमती रोडगे यांनी मागील तीन वर्षात शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि कर्मचारी यांना विश्वासात घेऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढ करत नगरपालिकेच्या शाळांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. या कामाच्या जोरावर आणि अनुभवामुळे त्यांना तालुका गटशिक्षणाधिकारी पदी पदोन्नती देण्यात आली आहे.
शुक्रवारी (दि. २६) रोजी याबद्दल तळेगाव येथे सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, ८४ शिक्षक, शिक्षण सेवक शिक्षण विभागाचे कर्मचारी व विविध शिक्षण संस्थांच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगर परिषद शिक्षण विभागाचे मयुरेश मुळे आणि बाळू जढर यांनी प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे यांचा सत्कार केला. नगर परिषदेच्या सातही शाळांतर्फे सर्व मुख्याध्यापकांनी यावेळी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देत त्यांना सन्मानित केले.
प्रशासन अधिकारी म्हणून जरी त्यांची बदली झाली असली तरी गटशिक्षणाधिकारी म्हणून त्यांना मावळ तालुक्यात मिळालेली पदोन्नती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चांगला आयाम देईल, असा विश्वास शिक्षकांनी यावेळी व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना शिल्पा रोडगे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना घडविणे हे आपले कर्तव्य असले तरी ते आपले जगणेच व्हायला पाहिजे. ज्येष्ठ, वरिष्ठ यांचा आदर, विद्यार्थी अन् पालकांना समजून घेण्याची क्षमता वाढविल्यास शिक्षक म्हणून समाजात आपण कायम आदरस्थानी असाल.
यासोबत, मावळ तालुक्यातील मुलामुलींनाही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण गटशिक्षणाधिकारी पदाला सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याचे शिल्पा रोडगे यांनी सांगितले. अनिल गाभने यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र बच्चे यांनी आभार मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग रद्द करा, प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा विरोध ; पर्यायी मार्ग शोधण्याची मागणी
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– मावळच्या शिरपेचात मानाचा तुरा ! तळेगावच्या ‘या’ दोन्ही पठ्ठ्यांनी जिंकली इटलीतील आयरनमॅन स्पर्धा
– मावळात जमीन गैरव्यवहाराची आणखीन एक घटना ; तोतया माणूस उभा करून जमीन विकली, गुन्हा दाखल