पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौड इथे शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्या पुढाकाराने शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. यावेळी मुळशी तालुक्यातील शिवसैनिकांसाठी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ह्या कार्यक्रमाला मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरत गोगावले, माजी खासदार – शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, युवासेना सचिव किरण साळी, शाखा प्रमुख संतोष डांगे, उप शाखाप्रमुख निखिल शेडगे, युवासेना उपतालुका प्रमुख समिर बारमुख, विद्यार्थी सेनेचे भरत देशपांडे, महिला आघाडी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. ( Shiv Sena public relations office inaugurated at Paud Mulshi taluka in presence of MP Shrikant Shinde )
अधिक वाचा –
– अडीच वर्षीय बालकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न, पित्याच्या प्रसंगावधानाने बचावला लेक, तळेगावातील धक्कादायक घटना
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । तिच्याच ‘लेखणीनं’ सोडवली तिची चौकटीतील घुसमट; कवयित्री कल्पना दुधाळ यांचा वाखण्याजोगा लेखनप्रवास
– पुण्यातील 30 ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे’ पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; मावळमधील दोन केंद्रांचा समावेश