व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, February 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्रीरंग बारणेंचे मंत्रिपद फिक्स? आढळराव पाटलांनी भर सभागृहात चंद्रकांत पाटलांना केली ‘ही’ खास विनंती

सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारे श्रीरंग बारणे हे खरे 'जनतेचे खासदार'

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 18, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, देश-विदेश, लोकल, शहर
Shrirang-Barne-Shivajirao-Adhalrao-Patil-Chandrakant-Patil

Photo Courtesy : Dainik Maval Graphics Team


मावळ लोकसभा मतदारसंघ दोन जिल्ह्यात विभागलेला असतानाही पायाला भिंगरी लावून खासदार श्रीरंग बारणे मतदारसंघात फिरतात. लोकांची कामे मार्गी लावतात. लोकांमध्ये मिसळतात. पूर्ण मतदारसंघात त्यांनी कामाच्या जोरावर लोकप्रियता मिळविली आहे. ते नागरिकांसाठी चोवीस तास उपलब्ध असतात. सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारा खासदार अशी श्रीरंग बारणे यांची ख्याती असल्याचे, गौरोद्वागार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशनच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त लोकाभिमुख कर्तव्य संपन्न, आदर्श व्यक्तिमत्वांचा आणि संस्थांचा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात गुरुवारी (दिनांक 16 फेब्रुवारी) पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. खासदार बारणे यांचे अभिष्टचिंतनही करण्यात आले. माजी मंत्री विजय शिवतारे, खासदार श्रीरंग बारणे, त्यांच्या पत्नी सरिता बारणे, माजी खासदार बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, इरफान सय्यद, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, माजी खासदार अमर साबळे, भाजपचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात, विजय फुगे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यावेळी उपस्थित होते. खासदार बारणे यांच्या कार्याची चित्रफीत दाखविण्यात आली. महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याचा विशेष सन्मान करण्यात आला. ( Shivajirao Adharao Patil Request To Chandrakant Patil To Get MP Shrirang Barne Ministerial Post In Modi Government )

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ”खासदार बारणे नागरिकांना सहज उपलब्ध होतात. त्यांनी शाल, श्रीफळ पुरता वाढदिवस मर्यादीत न ठेवता विविध क्षेत्रात काम करणा-यांचा सन्मान केला. वाढदिवसाला सामाजिक झालर ठेवली. 30 लाखांच्या लोकसंख्येच्या पिंपरी-चिंचवड शहरात संपूर्ण देश दिसतो. शहर उभारण्यात खासदार श्रीरंग बारणे यांचे मोठे योगदान आहे. राजकारणात सतत चढ उतार होत असतात. सातत्याने निवडून येणे अवघड असते. पण, खासदार बारणे सातत्याने निवडून येतात, हे सोपे नाही.”

हेही वाचा – खासदार श्रीरंग बारणेंच्या पाठपुराव्याला यश; मतदारसंघातील ‘या’ विकासकामासाठी राज्य सरकारकडून 47 कोटींचा निधी

”आपल्याबद्दल नकारात्मकता निर्माण न होऊ देता सातत्याने विजयी होणे हा त्यांचा मोठा गुण आहे. त्यांचा मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागला आहे. ते सातत्याने मतदारसंघात फिरतात. लोकांशी मिसळतात. पूर्ण मतदारसंघात त्यांनी कामाच्या जोरावर लोकप्रियता मिळविली आहे. त्यामुळे दोनवेळा खासदार झाले. महाराष्ट्रातील माणूस दिल्लीमध्ये जायला घाबरतो. भाषेच्या समस्येमुळे ‘न्यूनगंड’ निर्माण होतो. पण, खासदार बारणे ‘न्यूनगंड’ न ठेवता उत्तमपणे हिंदी भाषेत प्रश्न मांडत राहिले. मंत्र्यांच्या पाठीमागे लागून मतदारसंघासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. विविध कामे मार्गी लावली. या कामाचा जोरावर त्यांना सलग सातवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला”, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले. ( Shivajirao Adharao Patil Request To Chandrakant Patil To Get MP Shrirang Barne Ministerial Post In Modi Government )

माजी मंत्री विजय शिवतारे म्हणाले, ”पिंपरी-चिंचवडचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी मोठे प्रयत्न केले. त्यांनी पवना धरणातील गाळ स्व:खर्चाने काढला. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत झाली. रावेत बंधाऱ्याच्या वरच्या भागात तीन बंधारे बांधले. त्यामुळे पाणी साठवण क्षमता वाढली. विकास कामे करताना नागरिकांसह शेतकऱ्यांचीही ते काळजी घेतात. खासदार श्रीरंग बारणे यांनी माणसे कमविली. जनतेसाठी सदैव तत्पर असतात. त्यामुळे जनतेचा खासदार अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.”

View this post on Instagram

A post shared by Dainik Maval दैनिक मावळ (@dainikmaval)

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”थेरगावातून पाचवेळा निवडणुका लढलो. लोकांनी नेहमीच साथ दिली. काम करत असताना जनतेचा पाठींबा, प्रेम मिळाले. जनतेच्या पाठींब्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो आहे. लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारण्यात माझा पहिला नंबर येतो. मतदारसंघातील प्रश्नांना लोकसभेत वाचा फोडली. स्वातंत्र्य मिळाल्यापासून मावळातील अनेक गावात वीज, रस्ते नव्हते. तिथे वीज पोहोचविली. रस्ते केले. माथेरानची मेट्रो ट्रेन सुरू केली. पिंपरीत पासपोर्ट केंद्र सुरू केले. क्रांतिवीर चापेकर यांच्या नावाने टपाल तिकीट काढले. प्रामाणिकपणे लोकांसाठी काम करत आहे.”

“मागील अडीच वर्षे कामे होत नव्हती. त्यामुळे आम्ही वेगळा निर्णय घेतला. गेल्या सहा महिन्यात 100 कोटी रुपयांचा निधी मावळसाठी मिळाला आहे. कार्ला येथील आई एकविरा देवीच्या परिसराचा विकास होत आहे. याशिवाय वाहतूक कोंडी आणि अपघातांचा ‘ब्लॅकस्पॉट’ होत असलेल्या कार्ला फाटा येथे ओव्हर ब्रीज उभारण्यात येणार आहे. जनतेसाठी निस्वार्थपणे काम करत आहे.”

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, ”देशाच्या संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारण्याचे ‘रेकॉर्ड’ खासदार श्रीरंग बारणे यांच्या नावावर आहे. ते अभ्यासपूर्णपणे प्रश्नांना वाचा फोडतात. गर्व, मोठेपणा ठेवत नाहीत. सर्वांच्या मदतीला धावून जातात. संयमी स्वभाव आहे. आकांड- तांडव कधी करत नाहीत. मावळ मतदारसंघातील लोकांशी ते समरस झाले आहेत. चंद्रकांतदादा तुम्ही शब्द टाकला तर दिल्लीत बारणे यांना मंत्रिपद मिळेल.”

हेही वाचा – श्रीरंगआप्पा बारणे सोशल फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर! विविध क्षेत्रातील 20 मान्यवरांचा होणार सन्मान, पाहा पुरस्कार्थ्यांची यादी

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष धनाजी बारणे, उपाध्यक्ष रवी नामदे, सचिव बशीर सुतार, कार्यवाह विश्वजीत बारणे यांनी परिश्रम घेतले. तर, अमित गोरखे यांना शिक्षण रत्न, मुकुंद कुचेकर यांना समाजभूषण, डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांना कला गौरव, सुर्यकांत मूथियान -पर्यावरण भूषण, वसंत काटे- उद्योगरत्न, माया रणवरे- दुर्गारत्न, डॉ. नारायण सुरवसे- सेवाभूषण, प्रा. सुनिता नवले-दुर्गारत्न, विजयन -शिक्षणरत्न, शेखर कुटे-वारकरी भूषण, संगीता तरडे-दुर्गारत्न, अमरसिंह निकम-आरोग्य भूषण, वृशाली मरळ- आधारभूषण, संतोष कनसे-श्रमिक भूषण, आलम शेख, भगवान मुळे -समाजभूषण, जयदेव म्हमाणे -क्रीडारत्न, प्रमोद शिवतरे -समाजभूषण, अनिल साळुंखे-समाजरत्न आणि शुंभकर को-हौसिंग सोसायटीला आदर्श भूषण सोसायटी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात वाढदिवसानिमित्त खासदार बारणे यांचे पालकमंत्री पाटील यांनी पुष्पगुच्छ देवून अभिष्टचिंतन केले. यावेळी डावीकडून विश्वजीत बारणे, विजय फुगे, बशीर सुतार, रवी नामदे, अमर साबळे, सरिता बारणे, शिवाजीराव आढळराव, विजय शिवतारे, शिवराज राक्षे, इरफान सय्यद, बाळासाहेब वाल्हेकर आदी उपस्थित होते.

अधिक वाचा –

– मावळ तालुक्यातील ‘या’ गावात महाशिवरात्री निमित्त बहीण-भाऊ भेटीची अनोखी परंपरा
– ठाकरे धनुष्यबाणाची लढाई का हरले? वाचा निवडणूक आयोगाच्या आदेशातून शिंदेंच्या विजयाची प्रमुख 5 कारणे


Previous Post

शाब्बास पैलवान..! भाऊसाहेब कुंभार संकुल खोपोलीचा पैलवान सोहेल शेख ठरला गोल्डन बॉय

Next Post

गुडन्यूज..! सोमवारपासून पुणे ते लोणावळा लोकल रेल्वेच्या आणखीन दोन फेऱ्या, पाहा नवीन वेळापत्रक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pune-Lonavla-Local

गुडन्यूज..! सोमवारपासून पुणे ते लोणावळा लोकल रेल्वेच्या आणखीन दोन फेऱ्या, पाहा नवीन वेळापत्रक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
Marathi Language Conservation Fortnight celebrated at Savitribai Phule Women College Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ उत्साहात साजरा

February 2, 2026
Spontaneous response from women entrepreneurs to BizQuin competition organized by Skilletz Foundation

स्किलेट्झ फाउंडेशन आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आयोजित बिझक्विन स्पर्धेला महिला उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 2, 2026
NCP candidate Pallavi Sandeep Dabhade receives increasing support from voters in Induri Varale Zilla Parishad group Maval

इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवी संदीप दाभाडे यांना मतदारांचा वाढता पाठींबा

February 1, 2026
Voters respond positively to Dr Ashok Vitthal Date candidature in Takve Budruk Nane Zilla Parishad group Maval

टाकवे बुद्रुक – नाणे जिल्हा परिषद गटात डॉ. अशोक विठ्ठल दाते यांच्या उमेदवारीला मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद

February 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.