लोणावळा शहराजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या लायन्स पॉईंट इथे दरीत कोसळलेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधण्यात शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या जवानांना अखेर चार दिवसांनंतर यश आले आहे. संतोष शिळवणे (रा. रामनगर, लोणावळा) असे सदर मृत व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी (दिनांक सप्टेंबर) लायन्स पॉईंट येथील सुमारे दोन हजार फूट खोल दरीत शिळवणे यांचा मृतदेहाचे अवशेष पथकास मिळून आले. ( Shivdurg Mitra team succeeded in finding the body of the person who fell in valley at Lions Point )
प्राप्त माहतीनुसार, सोमवारी (दि. 25 सप्टेंबर) लायन्स पॉईंट येथून एक व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली होती. सदर व्यक्ती दरीत पडली असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र पथकाला घटनेची माहिती मिळताच सोमवारपासून शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मात्र दाट धुके आणि पाऊस यामुळे शोध कार्यात अडचण येत होती. खोल दरीत बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध घेत असताना बुधवारी दरीत उतरलेल्या बचाव पथकास कपडे आणि मृतदेहाचे काही अवयव मिळून आले होते. गुरुवारी (दि 28 सप्टेंबर) सकाळी शिवदुर्गने सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू केली. अखेर चार दिवसांच्या अथर प्रयत्नांनंतर प्रतिकूल परिस्थितीत मृतदेह शोधण्यास बचाव पथकाला यश आले.
पाण्याच्या प्रवाहाबरोबर मृतदेह खोल दरीत वाहून आल्याने छिन्नविछिन्न झाला होता. मोठ्या प्रयासाने मृतदेह दरीतून वर काढण्यास यश आले. याबत अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत. शिवदुर्ग मित्र टीमचे सुनील गायकवाड, सचिन गायकवाड, योगेश उंबरे, योगेश दळवी, ओंकार पडवळ, सनी कडु, गणेश गायकवाड, अशोक उंबरे, राजेंद्र कडु, महेश मसने, आनंद गावडे, दुर्वेश साठे, आदित्य पिलाने, आयुष वर्तक, यश सोनवने, दिव्येश मुनी, सागर कुंभार, रोहित फुनसे, हर्ष तोंडे, हर्षल चौधरी, प्रविण ढोकळे, कपिल दळवी, मयुर दळवी, सुनिल क्षीरसठ, ऋषीकेश येवले, नितेश कुटे आदींच्या पथकाने ही शोध मोहीम राबवली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– खासदार श्रीरंग बारणे यांची निर्दोष मुक्तता! अनधिकृत बांधकाम कारवाई विरोधात 10 वर्षापूर्वी पुकारले होते आंदोलन
– लई भारी! संपूर्ण पुणे जिल्ह्यात लोकसहभागातून 1200 वनराई बंधारे पूर्ण
– उज्जैन प्रकरण: ‘आपला समाज अमानवीय झाला आहे’ – प्रकाश आंबेडकर