Dainik Maval News : लोणावळा जवळील भुशी धरणात रविवारी (दि. 8 जून) दोन पर्यटक तरूणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. वर्षा विहारासाठी लोणावळा परिसरात आलेले हे तरूण भुशी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये पोहण्यास उतरले आणि बुडाले.
मोहम्मद जमाल आणि साहिल शेख अशी धरणात बुडून मृत्यू पावलेल्या तरूणांची नावे आहेत. दोघेही उत्तर प्रदेशातील मिरजापूर येथील रहिवासी असून सध्या थेरगाव, पुणे येथे कामाला होते. आपल्या आठ सहकाऱ्यांसोबत ते वर्षाविहारासाठी आले होते.
- जिथे ही घटना घडली तिथे पर्यटकांना जाण्यास मनाई असूनही हे तरूण तिथे गेले होते. घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस कर्मचारी, शिवदुर्ग मित्रचे आपत्कालीन पथक आणि स्थानिक युवक घटनास्थळी दाखल झाले. शिवदुर्ग मित्रच्या सदस्यांनी बचावकार्य सुरू केले. पुढील अर्ध्या तासात दोन्ही युवकांचे मृतदेह हाती लागले.
महेश म्हसणे, सचिन गायकवाड, कपिल दळवी, योगेश दळवी, दुर्वेश साठे, कुणाल कडू, हर्षल चौधरी, नीरज आवंढे, अशोक उंबरे, पिंटू मानकर, साहेबराव चव्हाण, श्याम वाल्मीक, महादेव भवर , राजेंद्र कडू, अनिल आंद्रे, सागर कुंभार, सागर दळवी यांनी शोध कार्यात सहभाग घेतला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहूनगरीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची लगबग सुरू ! वारकऱ्यांची सुरक्षा, सोयीसुविधांबाबत आढावा बैठक संपन्न । Dehu News
– सोमवारपासून लोणावळ्यातील भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करा ! जिल्हाधिकाऱ्यांचा ‘ऑन द स्पॉट’ निर्णय । Lonavala News
– ‘एमएसआरडीसी’कडून पुणे-मुंबई महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना ; वडगाव फाटा, कामशेत घाट, शिलाटणे फाटा भागाचा समावेश

